घरमहाराष्ट्रभाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

Subscribe

पिंपरी- चिंचवड शहर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (60) यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, कन्या ऐश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील विविध पक्षांचे नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आमदार जगताप मागील 35 वर्षांपासून राजकारणात कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी चार वेळा नगरसेवक आणि चार वेळा आमदारपदही भूषविले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली होती.

- Advertisement -

आपल्या मतदारसंघात जनहिताची कामे करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता. समाजासाठी वाहून घेतलेल्या दुर्मीळ माणसांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनामुळे समाजात आणि पक्षात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही मतदान केले. आज आमच्यातून एक योद्धा निघून गेल्यामुळे अतिशय दुःख झाले, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -