घरमहाराष्ट्रकोरोना लसीच्या साठ्यावरून ठाकरे सरकार- विरोधक आमने-सामने

कोरोना लसीच्या साठ्यावरून ठाकरे सरकार- विरोधक आमने-सामने

Subscribe

महाविकास आघाडी सरकार कोरोना लसीच्या डोसवरून राजकारण करत असल्याचा विरोधाकांचा आरोप

एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच राज्यात दुसरीकडे कोरोना लस धुळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला पून्हा टार्गेट करण्यास सुरु केले आहे. सिंधुदुर्गातील भाजपा आमदार नितेश राणे यांनीही कोरोना लसीच्या साठ्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्गात २६ हजार कोरोना लस धूळ घात असून महाविकास सरकारचे यातून अपयश दिसत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.

”महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री कोरोना लसीचा साठा महाराष्ट्राला पुरेसा दिला नाही असे म्हणत केंद्राकडे बोट दाखवत आहेत. परंतु सिंधुदुर्गात दिलेल्या ४० हजार डोसपैकी फक्त १४ हजार डोस ६० वर्षावरील नागरिकांना दिले गेले आहे. म्हणजे २६ हजार लसीचे डोस असून आरोग्य विभागाकडे पडून आहेत. यावरून महाविकास आघाडी सरकारचे अपयश दिसून येत आहे. फक्त नौटंकी सुरु आहे.” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

- Advertisement -

यामुळे राज्यात कोरोना लसीच्या साठ्यावरुन राजकारण रंगु लागले आहे. केंद्राने महाराष्ट्राला कोरोना लसीचा पुरवठा वाढवून घ्यावा अशी मागणी राज्य सरकारने केली होती. यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केंद्राने महाराष्ट्राला पुरवलेल्या ५४ लाख लसीच्या पुरवठ्यातील ५६ टक्के साठा पडून असल्याला दावा केला. जावडेकर यांनी म्हटले की, महाराष्ट्राला केंद्राने पुरवलेल्या ५४ लाख लसींच्या साठ्यांपैकी १२ मार्चपर्यंत फक्त २३ लाख लसींचा वापर झाला आहे, त्यामुळे ५६ टक्के लसीेचे डोस पडून राहिले असल्याचा दावा केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले की, आधी देशातील लोकांचे लसीकरण करावे आणि मग केंद्र सरकारने इतर देशांना मदत करावी. त्यामुळे लस साठ्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत.(Corona Vaccination)

- Advertisement -

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ‘केंद्राने महाराष्ट्राला दिलेल्या ५६ टक्के कोरोना लसीकरण साठा पडून आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार केंद्राने लसीकरणाचा साठा कमी दिला असे सांगून राजकारण खेळ आहे. परंतु राज्याने दिलेला लसीचा साठा पहिला वापरा पाहिजे.’ असे म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. याआधी केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याला पत्र पाठवत महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरून राज्य सरकार नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे आता राज्यातील कोरोना लस साठ्य़ावरून केंद्रविरुद्ध महाराष्ट्र असा वाद सुरु झाला आहे.


हेही वाचा- Corona Vaccination: देशातील अनेक राज्यात लाखो कोरोना लस धूळखात पडून

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -