घरताज्या घडामोडीभाजपा आमदार सुरेश धस यांनी दुसऱ्यांदा मोडला लॉकडाऊनचा नियम

भाजपा आमदार सुरेश धस यांनी दुसऱ्यांदा मोडला लॉकडाऊनचा नियम

Subscribe

लॉकडाउनचा नियम मोडल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पाटण तालुका आष्टी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले असताना देखील त्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने भाजपा आमदार सुरेश धस यांनी तिथे जाऊन लोकांशी संवाद साधला. याप्रकरणी भाजपा आमदार धस यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाबंदीचा आदेश डावलून ऊसतोड मजुरांना मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेमके काय घडले?

बीड जिल्ह्यातील सांगवी पाटण येथे एकाच कुटुंबातील सात व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्या भागातील ५ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली. मात्र, तरी देखील १८ मे रोजी सकाळी आमदार सुरेश धस स्वत:सांगवी पाटण गावात गेले होते. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यामुळे परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

यापूर्वी ही झाला होता गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती आमदार सुरेश धस यांना मिळाली. त्यानंतर ते मदतीसाठी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून भिगवण येथे गेले होते. दरम्यान, संचारबंदीच्या काळात जिल्हा बंदीचे आदेश आहेत. मात्र, तरी देखील ते सीमा ओलांडून गेले. यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


हेही वाचा – कोविडसोबत राहायचंय, तर सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल – आरोग्यमंत्री


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -