घरताज्या घडामोडीBJP : सर्वसामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो; मातोश्रीवर अपमानच होतो; भाजपाचा...

BJP : सर्वसामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो; मातोश्रीवर अपमानच होतो; भाजपाचा राऊतांवर हल्लाबोल

Subscribe

भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. पण संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठामध्ये केवळ ठाकरे आणि त्यांच्या 33 वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरच अपमान येतो, असे ट्वीट करत खासदार संजय राऊतयांना भाजपने प्रत्युत्तर दिले.

भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. पण संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठामध्ये केवळ ठाकरे आणि त्यांच्या 33 वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरच अपमान येतो, असे ट्वीट करत खासदार संजय राऊतयांना भाजपने प्रत्युत्तर दिले. (BJP Slams shiv sena thakeray group mp sanjay raut on nitin gadkari chandrashekhar bawankule)

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटत नाही आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने 195 उमेदवरांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचे नाव नव्हते. त्यावेळी भाजपने ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली, असा टोला विरोधकांनी लगावला होता. त्यावर नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. “विधानसभेला जे बावनकुळे स्वत: तिकीट मिळू शकले नव्हते, ते नितीन गडकरींसारख्या थोर आणि ज्येष्ठ भाजप नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे”, अशी टीका राऊतांनी केली.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपने ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडत असतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते. महाविकास आघाडीचे जागावाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत. ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात, त्यांना धमकावतात, नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत”, असे प्रत्युत्तर भाजपने राऊतांना दिले.

याशिवाय, “संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना ‘हट्ट करू नका’ असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे. आज संजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. पण राऊत हे विसरले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठामध्ये केवळ ठाकरे आणि त्यांच्या 33 वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो”, असेही भाजपने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

- Advertisement -

तसेच, “नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरींचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये”, असेही भाजपने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.


हेही वाचा  – WOMENS DAY : देशातील हुकूमशहा संपवावा; उद्धव ठाकरेंचं महिलांना आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -