घरमहाराष्ट्रविरोधात बातम्या येऊ नयेत म्हणून काय करायचं? बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला...

विरोधात बातम्या येऊ नयेत म्हणून काय करायचं? बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला ‘हा’ अजब सल्ला

Subscribe

पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी नगर येथे भाजप पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिला.

अहमदनगर: पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे भाजप पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिला.

बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी, 24 सप्टेंबरला शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत त्यांनी पत्रकारांसाठी दिलेल्या सूचनांबाबतची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतं आहे.

- Advertisement -

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

बावनकुळे यावेळी म्हणाले की, ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक्स मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असं काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्टॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच असं त्यांनी म्हटलं.

(हेही वाचा: लोकशाही मान्य नाही हे सांगावे अन्यथा…, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुप्रिया सुळे आक्रमक )

- Advertisement -

बावनकुळेंनी माफी मागावी- सुप्रिया सुळे

विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हे विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणं हे त्यांचं काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. पत्रकारांना निर्भिडपणे काम करू द्यायचे नाही हे भाजपचं धोरणच आहे. भाजपने एकतक उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधानं केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -