घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेवर भाजपचा स्वबळावर महापौर, भाजप 134 जागा जिंकणार, आशिष शेलारांचा मोठा...

मुंबई महापालिकेवर भाजपचा स्वबळावर महापौर, भाजप 134 जागा जिंकणार, आशिष शेलारांचा मोठा दावा

Subscribe

गेल्या 25 वर्षांत युतीमध्ये शिवसेना सडली असे ते म्हणत असले तरी, खरे भाजपचं सडली, असे आशिष शेलार म्हणाले. युतीमध्ये असताना शिवसेनेने आम्हाला कधीही स्थायी समिती अध्यक्ष पद दिले नव्हते. इतर समित्या दिल्या. मात्र आर्थिक बाबीमध्ये आम्हाला निर्णय घेऊ दिले नाहीत. भाजप होती म्हणूनच क्रॉफर्ड मार्केट हेरिटेज म्हणून अस्तित्वात आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने प्रभाग रचना बदलून आणि भाजपचे वॉर्ड फोडून कितीही आदळआपट केली तरीही महापालिकेवर बीएमसी 134 आणि भाजप 134 + महापौर हे गणित होणार आणि भाजपची सत्ता येणारच, असा दावा महापालिका निवडणुकीची प्रमुख जबाबदारी खांद्यावर घेणारे भाजपचे आमदार ऍड आशिष शेलार यांनी केला. मुंबई महापालिका भाजप पक्ष कार्यालयाकडून मंगळवारी रात्री आयोजित एका वार्तालापाच्या निमित्ताने पत्रकारांशी सुसंवाद साधताना त्यांनी वरीलप्रमाणे दावा केला आहे.

मात्र “बीएमसी 134; भाजप 134 + महापौर” म्हणजे काय, याचा अर्थ काय ? या प्रश्नाचे उत्तर उलगडून सांगताना शेलार म्हणाले की, बीएमसी 134 म्हणजे मुंबई महापालिकेला 134 वर्षे झाली आहेत. तर 134 म्हणजे भाजप 236 जागा स्वबळावर लढणार आणि 134 जागा भाजप जिंकणार आणि भाजपचाच महापौर निवडून येईल, असा दावा शेलार यांनी केला आहे.मात्र मनसेसोबत युती करण्याबाबत स्पष्ट नकार दिलाय. यावेळी भाजपचे आमदार योगेश सागर, राजहंस सिंह, मिहीर कोटेचा, नितेश राणे, भाजपचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट आणि भाजपचे अनेक नगरसेवक उपस्थित होते.

- Advertisement -

गेल्या 25 वर्षांत युतीमध्ये भाजपच सडली

गेल्या 25 वर्षांत युतीमध्ये शिवसेना सडली असे ते म्हणत असले तरी, खरे भाजपचं सडली, असे आशिष शेलार म्हणाले. युतीमध्ये असताना शिवसेनेने आम्हाला कधीही स्थायी समिती अध्यक्ष पद दिले नव्हते. इतर समित्या दिल्या. मात्र आर्थिक बाबीमध्ये आम्हाला निर्णय घेऊ दिले नाहीत. भाजप होती म्हणूनच क्रॉफर्ड मार्केट हेरिटेज म्हणून अस्तित्वात आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको

खरे तर निवडणूक वेळेतच होणे आवश्यक आहे. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको. वास्तविक, सत्ताधारी महाविकास आघाडीने कोविड व ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोविड काळात इतर निवडणुका झाल्या. दोन वर्षांपूर्वी आमचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी करून आणि पत्र देऊनही त्यावेळी ओबीसी आयोग नेमण्यात आला नाही. ओबीसी इंपिरियल डाटाबाबत उगाचच केंद्र सरकारला दोष देऊ नये.

- Advertisement -

प्रभाग रचनेतील बदल ही सेनेची पराभूत मानसिकता

सत्ताधारी शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना करून त्यात मोठे बदल केले. त्यांनी 236 पैकी त्यांना अनुकूल 96 वॉर्ड जसेच्या तसेच ठेवले आहेत. या 96 पैकी 53 वॉर्ड शिवसेनेचे आहेत. तर 140 वॉर्ड फोडले आहेत. त्यापैकी भाजपचे 52 वॉर्ड फोडले आहेत. शिवसेनेला हे का करावे लागले ? तर खरे तर ही सेनेची पराभूत मानसिकता आहे, असा आरोपही शेलार यांनी केला आहे. वास्तविक त्यांनी नैसर्गिक परिसीमा ठेवायला पाहिजेत,अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आयुक्तांवर भाजपचे पहारेकऱ्यांची करडी नजर

सध्या मुंबई महापालिकेवर आयुक्त इकबाल चहल यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले असले तरी भाजपचे पहारेकरी हे करडी नजर ठेवणार आहेत. मुंबईसाठी जे आवश्यक आहे ते निर्णय त्यांनी घ्यावेत, विकास कामे करावीत मात्र ठराविक विभाग व ठराविकच कंत्राटदार असे आम्ही होऊ देणार नाही. ज्यांच्यावर सीबीआय, आयटी धाडी ते म्हणत नाहीत ‘मी निर्दोष आहे.’ ईडी व आयटी यंत्रणेकडून ज्यांच्यावर आजपर्यंत धाडी पडल्या ते कोणीही कधीच म्हणत नाहीत की, आम्ही निर्दोष आहोत. याउलट पोलीस यंत्रणा सूडबुद्धीने आमच्या लोकांवर कारवाई करते, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

370 प्रस्तावांवर एक मिनिटंही चर्चा नाही

मुंबई महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत 6 हजार कोटींचे 370 प्रस्ताव अवघ्या 30 मिनिटात मंजूर करण्यात आले, मात्र एकाही प्रस्तावावर एक मिनिटंही चर्चा करण्यात आलेली नाही. हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही याविरोधात न्यायालयात जात नाही, कारण की, त्यापैकी काही प्रस्ताव, विकासाकामे ही नागरिकांसाठी आवश्यक आहेत. मात्र सत्ताधारी हे डोळे मिटून मांजरासारखे दूध पित आहेत, असा चिमटाही आशिष शेलार यांनी यावेळी शिवसेनेला काढला.


हेही वाचाः माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण…, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -