घरमनोरंजनBigg Boss 15 : TRP रेटिंग घसरल्याने बंद होणार सलमान खानचा बिग...

Bigg Boss 15 : TRP रेटिंग घसरल्याने बंद होणार सलमान खानचा बिग बॉस शो!

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनमध्ये एकेकाळी टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा बिग बॉस शो आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. बिग बॉसचे गेले अनेक सीजन म्हणावे तसे हिट होऊ शकले नाही. त्यामुळे एकाएकी शो बंद करण्याचा निर्यण घेण्यात आल्याचे म्हटले जातेय. यंदाच्या सीजनमधील १५ स्पर्धकांची नावं समोर आल्याने प्रेक्षक अधिकच एक्साइट होते. आजवर अनेक बडे सेलिब्रिटी स्टार तसेच समाजातील नावाजलेल्या व्यक्ती या शोचा भाग झाल्या, असे असतानाही शो फ्लॉप होत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेय. यंदाचा १५ व्या सीजनमधील स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सफशेल अपयशी ठरले आहेत.

शोचा टीआरपी प्रत्येक आठवड्यात खाली-खाली येत आहे. इकतेच नाही तर सलमान खानच्या विकेंड का वार एपिसोडही टीआरपी रेटिंगमध्ये मार खातोय. या सीजनचे अपयश पाहता बिग बॉसच्या मेकर्सने वेळेतच शो बंद करण्याचा ऑप्शन निवडल्याची माहिती समोर आलीय. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, शोचा सतत कमी होणारा टीआरपी पाहाता मेकर्सने फेब्रुवारी २०२२ च्या आधी बिग बॉस शो ऑफएयर करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

बिग ब़ॉसचा १५ वा सिझन हिट करण्यासाठी मेकर्सने यंदा अनेक एक्सपेरिंमेंच केले होते. कंटेस्टेंट्स, होस्ट आणि शोवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. यंदा जंगल या थीमवर आधारित सेटअप तयार करण्यात आलाय. तर टिव्ही इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टारर्सला शोचे स्पर्धक म्हणून निवडले. याशिवाय बिग बॉसचा होस्ट अभिनेता सलमान खानलाही तगडा पेमेंट केला. एका रिपोर्टनुसार, या शोमधील संपूर्ण गोष्टींवरील खर्च जवळपास ५०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मेकर्सला यंदाच्या सीजनमधून खूप अपेक्षा होत्या. मात्र या सर्व अपेक्षा माती मोल झाल्यात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

नेहा-राकेशची एंट्री ठरली फ्लॉप

शोमधील प्रत्येक स्पर्धकाचा खराब परफॉर्मेंस अनेकांसाठी शॉकिंग आहे. अनेक प्रयत्न करुनही शोचा टीआरपी दिवसेंदिवस अधिकच घसरतोय. पहिल्या दोन आठवड्यात शो अधिक हिट ठरला. मात्र त्यानंतर शो अधिकच ठेपाळत गेला. सलमान खानच्या विकेंट का वार एपिसोडनेही टीआरपी रेटिंग बूस्ट होऊ शकली नाही. गेल्या आठवड्यात शोचा टीआरपी १ वर होता. यात नेहा भसीन आणि राकेश बापतची एंट्री काहीच कमाल करु शकली नाही.

लव्ह अँगलमुळे शोचे अधिक नुकसान

यंदाच्या बिग बॉस शोमध्ये लव्ह अँगलला जरा जास्त फुटेज दिले जातेय. आणि हाच फुटेज शोचा मोठा ड्रॉ बॅक मानला जातोय. विशेषत: TejRan आणि shara यांच्यावर केला जाणारा फोकस प्रेक्षकांना शोपासून अधिक दूर करतोय. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, लव्ह अँगलमुळेचे शोचे मोठे नुकसान होतेय. शो टेलिकास्ट होण्याआधीच अनेक जण स्पर्धकांमधील लव्ह अँगल समोर आणताय. त्यामुळे प्रेक्षकांना तोच तोच लव्ह अँगल पून्हा पाहण्यात काहीच एंट्रेस राहत नाही.

या सर्व गोष्टींचा विचार करुन मेकर्स १५ वा सीजन छोटा करु पाहतायत किंवा शो फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा विचार करतायत. सतत घसरणारा टीआरपी पाहता शो फेब्रुवारी पूर्वीच ऑफएअर केला जाईल. यात गेस्ट आणि होस्ट सलमान खान वारंवार इशारा देऊनही घरातील स्पर्धक गेममध्ये काहीच चेंज आणत नाहीत. त्यामुळे बिग बॉस सीजन १५ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -