घरमहाराष्ट्रहुबळी रेल्वेस्टेशन स्फोट : शिवसेनेचा 'हा' आमदार निशाण्यावर?

हुबळी रेल्वेस्टेशन स्फोट : शिवसेनेचा ‘हा’ आमदार निशाण्यावर?

Subscribe

त्यामुळे या स्फोटाच्या निशाणावर शिवसेनेचे आमदार होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कालच्या स्फोटात हुसेनसाब नईवाले हा तरुण गंभीर जखमी झाला होता.

कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्थानकात काल स्फोट झाल्याची घटना घडली. एका पार्सलमध्ये हा स्फोट झाला होता. या प्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संशयित पार्सलवर कोल्हापूरमधील राधानगरी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आहे. प्रकाश आबिटकर यांच्या नावाने हे पार्सल स्टेशनवर आले होते. त्यामुळे या स्फोटाच्या निशाणावर शिवसेनेचे आमदार होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कालच्या स्फोटात हुसेनसाब नईवाले हा तरुण गंभीर जखमी झाला होता.

prakash aabitkar.jpg
प्रकाश आबिटकर

दरम्यान काल आरपीएफच्या जवानाला अमरावती एक्सप्रेसमध्ये एक संशयीत बॉक्स सापडला होता. बॉक्स संशयास्पद वाटल्याने त्याने तो बॉक्स प्लॅटफॉर्मवर आणला. त्यानंतर स्टेशनवर खाद्यपदार्थाची विक्री करणारे हुसेनसाब नईवाले याला त्याने तो बॉक्स उघडण्यास सांगितले. बॉक्स उघडत असतानाच स्फोट झाला. या स्फोटात हुसेनसाब जखमी झाला. उपचारासाठी त्याला किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेल्वेस्थानकातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली स्फोटाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. डुकरांना मारण्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटकं बॉक्समध्ये सापडल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -