घरमहाराष्ट्र'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरची भाजपमध्ये एन्ट्री

‘खल्लास गर्ल’ ईशा कोप्पीकरची भाजपमध्ये एन्ट्री

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोपीकर हिने आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर ईशा भाजपाच्या नवं भारतीय शिववाहतुक संघटनेची ब्रँड अब्यासिडर झाली आहे.

‘एक विवाह ऐसा भी’, ‘राईट या राँग’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘डरना जरुरी है’, ‘क्या कूल है हम’, ‘हम तुम’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर ईशा भाजपाच्या नवं भारतीय शिववाहतुक संघटनेची ब्रँड अब्यासिडर झाली आहे. त्यामुळे राजकारणात प्रवेश केलेल्या अभिनेत्रीमध्ये आता ईशाचाही समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात ईशाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पक्षाच्या देशव्यापी वाहतूक संघटनेची घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपाच्या वाहतूक संघटनेतील देशपातळीवरची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

- Advertisement -

इशा बजावणार महत्वाची भूमिका

अन्नदाता वाहतुक विभाग या संघटनेकडून सुरू करण्यात येणार असून, यामध्ये इशा महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मी भाजपसाठी चांगल काम करेन

आज मी खूप मोठ्या परिवारासह जोडली जात आहे, याचा मला आनंद आहे. तुमच्या सोबत मला जोडता आले याचा मला अभिमान आहे. तसेच जर मी चुकली तर मला तुम्ही माफ कराल. मी भाजप पक्षासाठी चांगल काम करीन. त्याचबरोबर मी माझी जबाबदारी पूर्ण करीन.  – ईशा कोप्पीकर, बॉलिवूड अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -