घरमहाराष्ट्रनाशिककारवाईसाठी आले अन् अंग खाजवत पळाले

कारवाईसाठी आले अन् अंग खाजवत पळाले

Subscribe

पंचवटीत पोलिसांवर काचकुयरीचा मारा, गाडीवरही केला दगडांनी हल्ला

फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी गणेशवाडीच्या शेरीमळा येथे कारवाईसाठी पोहचलेल्या सरकारवाडा पोलिसांवर महिला व तरूणांनी काचकुयरीच्या शेंगांचा मारा करताच पोलिसांच्या अंगाला खाज सुटली. त्यामुळे कारवाई अर्ध्यावर सोडून पोलिसांना माघारी फिरावे लागले. दरम्यान, हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक केल्याने पोलीस वाहनाच्या काचा फूटल्या. ही घटना रविवारी (२७ जानेवारी) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक विवेक बैरागी यांच्याकडे एका फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास होता. या गुन्ह्याबाबत कारवाईसाठी बैरागी हे पोलिस कर्मचारी बागडे, पळशीकर व कुटे यांच्यासमवेत पोलीस वाहन क्रमांक (एम.एच१५ ई.ई २४८) गणेशवाडीतील शेरीमळ्यात रविवारी दुपारी पोहचले. चौकशी सुरू असताना जमलेल्या जमावापैकी संशियत पुंडलिक गोविंद उशीर, संदीप मधुकर पगारे, गुलाब तरळ, मोहन उशीर, संजय पाटील, गौरव उशीर, सुनील सोळसे, गुलाबबाई चव्हाण, बेबी गरड व अन्य संशियतांनी गर्दी केली. त्यावेळी मोहन उशीर याने पोलीसांवर दगडफेक करून पोलीस गाडीची काच फोडली. नंतर संजय पाटील याने बैरागी व कर्नावट यांना हाताला मारहाण करून अंगावर काचकुयरीचा मारा करत जीवे मारण्याची धमकी दिली. काचकुयरीचा शरीराला स्पर्श झाल्यामुळे पोलिसांना अंगाला खाज सुटली.

- Advertisement -

परिसरात तणावाचे वातावरण

जमाव जमल्याने तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, अशोक भगत यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पुंडलिक उशीर, संदीप पगारे, गौरव उशीर, सुनील सोळसे या चौघा संशियतांना ताब्यात घेतले. पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -