घरमहाराष्ट्रबॉलिवूडचे प्रसिध्द संगीतकार खय्याम यांची प्रकृती गंभीर; मुंबईत उपचार सुरू

बॉलिवूडचे प्रसिध्द संगीतकार खय्याम यांची प्रकृती गंभीर; मुंबईत उपचार सुरू

Subscribe

फुप्फुसातील इन्फेक्शनमुळे त्यांना रूग्णालयात दाखल

बॉलिवूडचे प्रसिध्द संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम यांची प्रकृती अचानक खराब झाली होती. त्यामुळे त्यांना रात्री उशीरा मुंबईच्या सूरज रूग्णालयात दाखल केले आहे. फुप्फुसातील इन्फेक्शनमुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या खय्याम यांची प्रकृती गंभीर असल्याने मागील काही आठवड्यापासून रूग्णालय़ात उपचार सुरू असून त्यांना आय़सीय़ूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती गंभीर असून ९२ वर्षाचे असणारे खय्याम यांना मागील रविवारी मुंबईच्या सूरज रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते आय़सीय़ूमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

खय्याम यांनी आपल्या करिअरची सुरूवात वयाच्या १७ व्या वर्षी केली होती. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘फुटपाथ’मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. १९६१ मध्ये आलेला चित्रपट ‘शोला और शबनम’मधील त्यांचे संगीत लोकप्रिय झाले. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. यामध्ये आखिरी खत, कभी-कभी, त्रिशूल, नूरी, बाजार, उमराव जान, यात्रा यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -