घरमहाराष्ट्रपुणेBreaking News : वंचितकडून वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी, तिसऱ्या यादीतून घोषणा

Breaking News : वंचितकडून वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी, तिसऱ्या यादीतून घोषणा

Subscribe

Lok Sabha Election 2024 : पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असलेले पुण्यातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असलेले पुण्यातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज मंगळवारी (ता. 02 एप्रिल) वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर करण्यात आली अशून या यादीमध्ये वसंत मोरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. (Breaking News: Vasant More nominated from Vanchit Bahujan Aghadi from Pune Lok Sabha)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : निवडणुकीपर्यंत तू घर सोड, नाहीतर मी सोडतो; काय आहे प्रकरण?

- Advertisement -

पुण्यातील धडाडीचे राजकीय नेते अशी ओळख असलेले वसंत (तात्या) मोरे यांनी मागील महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला सोडचिठ्ठी देत राज ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी थेट पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. ज्यामुळे ते मविआकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मविआने खेळी खेळत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली. ज्यामुळे नाराज झालेल्या वसंत मोरेंनी इतर कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळते, यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाकडून पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण याचदरम्यान त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते नेमके कोणाकडून निवडणूक लढणार हे स्पष्ट नव्हते. इतकेच काय तर वसंत मोरे यांना कोणाकडून उमेदवारी मिळाली नसती तर ते अपक्ष निवडणूक लढण्यासही तयार होते. पण आज अखेरीस वंचितकडून त्यांच्या गळात लोकसभा उमेदवारीची माळ घालण्यात आली आहे. तर मनसेतून अनेक वर्षांच्या कार्यकाळानंतर बाहेर पडलेले वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीत अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत.

वंचितचा बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीने आज मंगळवारी लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. मविआसोबत लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार असलेले प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे वंचित आणि मविआमध्ये सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याचे समोर आले. त्यानंतर आतापर्यंत मविआने 24 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. पण आजच्या यादीतून वंचितने मात्र, बारामती लोकसभेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा… Mahayuti : लोकसभेच्या जागांसाठी शिंदेंची भाजपशी झुंज; उमेदवार निश्चितीत भाजपचा हस्तक्षेप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -