घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकर्मकांडाला फाटा : ८३ वर्षीय आजीचे मरणोत्तर देहदान

कर्मकांडाला फाटा : ८३ वर्षीय आजीचे मरणोत्तर देहदान

Subscribe

नाशिक : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे (वय ८३) यांचे आजारपणामुळे गुरुवारी (दि.२) निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान केले. त्यांचा देह डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आला आहे. त्यांचे कोणतेही कर्मकांड करणार नसल्याची माहिती चांदगुडे कुटुंबियांनी दिली.

विधवा प्रथा निर्मूलनाचे शासनाने परीपत्रक काढल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच सुगंधाबाई चांदगुडे यांनी त्याची अंमलबजावणी केली होती. विधवा असूनही त्यांनी टिकली,मंगळसूत्र, जोडवे परिधान केले होते. चांदगुडे कुटुंबियांनी याआधीही अनेक पुरोगामी निर्णय घेऊन समाजाला आदर्श घालून दिला आहे. सुगंधाबाई यांची आदरांजली सभा रविवार, दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या मूळगावी चासनळी (ता. कोपरगाव) येथे होणार आहे. यावेळी देहदान व अवयवदान, काळाची गरज या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्त व फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅन्ड बॉडी डोनेशन,मुंबईचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. या प्रसंगी मरणोत्तर देहदानाची इच्छा असणार्‍या व्यक्तींचे फॉर्म भरून घेणार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -