घरमहाराष्ट्रसरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन; ७व्या वेतन आयोगाला कॅबिनेटची मंजुरी

सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन; ७व्या वेतन आयोगाला कॅबिनेटची मंजुरी

Subscribe

सातव्या वेतन आयोगाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता निवृत्तीवेतन धारकांसह २५ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आजचा दिवस हा दिवाळी समान आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण, सातव्या वेतन आयोगाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता निवृत्तीवेतन धारकांसह २५ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१९पासून ही प्रत्यक्ष वेतनवाढ मिळणार असून फेब्रुवारी २०१९च्या पगारामध्ये ही वाढ दिसून येईल. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महिना पाच हजार पासून १४ हजार रूपयांपर्यंत वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांनी सामुहिक आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारनं अखेर सातवा वेतन आयोग लागू केला आहे.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर चतुर्थश्रेणी कर्माचाऱ्यांच्या पगारामध्ये महिना ४ ते ५ हजार, तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महिना ५ ते ८ हजार, तर द्वितीय आणि प्रथमश्रेणी अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये महिना ९ ते १४ हजार रूपयांपर्यंत वाढ होणार आहे. तसेच सध्या मिळणाऱ्या पगारवाढीच्या सुत्रात बदल होणार आहेत. त्यासाठी १० वर्षे, २० वर्षे आणि ३० वर्षे असे टप्पे ठरविण्याचा प्रस्ताव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -