घरमनोरंजनThackeray ट्रेलरवर अभिनेता सिद्धार्थ नाराज

Thackeray ट्रेलरवर अभिनेता सिद्धार्थ नाराज

Subscribe

‘उठाओ लुंगी, बजाओ पुंगी’ हा संवाद दक्षिण भारतीयांविरोधात द्वेष पसरवणारा आहे असं म्हणत, अभिनेता सिद्धार्थने ठाकरे ट्रेलविरोधात आक्षेप नोंदवला आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपटाची  ट्रेलर काल (बुधवारी) लाँच करण्यात आला. आधीपासूनच काही ना काही कॉन्ट्रव्हर्सीजमध्ये अडकलेला चित्रपटाचा ट्रेलर, आता प्रदर्शनानंतरही पुन्हा वादात अडकला आहे. रिलीजपूर्वी सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतील  ट्रेलवर, दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ याने टीका केली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून सिद्धार्थने ठाकरे चित्रपटाच्या ट्रेलरनविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याकाळात शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या एका दाक्षिणात्य आंदोलनाची झलक दाखवली आहे. यामध्ये ‘उठाओ लुंगी, बजाओ पुंगी’ असा संवाद आहे. हा संवाद दक्षिण भारतीयांविरोधात द्वेष पसरवणारा आहे, असं म्हणत सिद्धार्थने ट्रेलविरोधात आक्षेप नोंदवला आहे. सोबतच अशाप्रकरचा द्वेष पसरवण्याचं काम करणाऱ्या चित्रपटाला तुम्ही प्रतिसाद द्याल का? असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.

- Advertisement -

इतकंच नाही तर सिद्धार्थने ‘ठाकरे’ चित्रपटाच्या मराठी ट्रेलरवरही टीका केली आहे. नुकतंच त्याने याबाबत एक ट्वीट करुन, ‘ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर हा अतिशय निराशाजनक असून, या चित्रपटाद्वारे रोमान्स आणि हिरोईजम विकण्याचा प्रयत्न केला जात आहे’, अशी टीका अभिनेता सिद्धार्थ याने केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून अवास्तव संगीत, वाघाच्या डरकाळीचा आवाज याचा भडीमार केला असून, ट्रेलरमधून दक्षिण भारतीय नागरिकांचा अपमान केला आहे’, अशा अर्थाचं ट्वीट अभिनेता सिद्धार्थने केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -