घरक्राइमराज्यपाल पद, राज्यसभेचे तिकीट 100 कोटीला! सीबीआयने केला महाराष्ट्रातील रॅकेटचा पर्दाफाश

राज्यपाल पद, राज्यसभेचे तिकीट 100 कोटीला! सीबीआयने केला महाराष्ट्रातील रॅकेटचा पर्दाफाश

Subscribe

राज्यपाल पद आणि राज्यसभेच्या तिकिटांबाबत खोटी आश्वासने देऊन लोकांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केले असून, यामध्ये महाराष्ट्रातील आरोपींचा संबंध असल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

राज्यपाल पद आणि राज्यसभेच्या तिकिटांबाबत खोटी आश्वासने देऊन लोकांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केले असून, यामध्ये महाराष्ट्रातील आरोपींचा संबंध असल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे. (CBI Busts Racket Falsely Promising Governorship Rajya Sabha Seats For Rs 100 Crore)

सीबीआच्या एफआयआरमध्ये महाराष्ट्रातील लातूर विभागातील कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकातील बेळगावचे रवींद्र विठ्ठल नाईक आणि महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि दिल्ली-एनसीआरचे मोहम्मद एजाज खान यांची नावे दाखल केली आहेत.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, “या आरोपींमधील बंडगर हा सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता. एवढेच नाही तर तो उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध लोकांसमोर दाखवत होता. तो बुरा, अरोरा, खान आणि नाईक यांना लोकांना काम देण्याचे आमिष दाखवत होता. जेणेकरून त्या बदल्यात करोडो रुपयांचे सौदे करता येतील”, अशी माहिती सीबीआच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शोध मोहिमेदरम्यान एक आरोपी पळून गेला

- Advertisement -

दरम्यान, सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करून शोध मोहिमेदरम्यान एक आरोपी पळून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय आरोपींनी राज्यसभेतील जागांची व्यवस्था, राज्यपालपदी नियुक्ती, केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांतर्गत विविध सरकारी संस्थांमध्ये अध्यक्षपदी नियुक्ती अशी खोटी आश्वासने देऊन खासगी व्यक्तींना फसवण्याचा कट रचला होता.


हेही वाचा – दुपारचे जेवण मुंबईत तर रात्रीचे दिल्लीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर पटोलेंची टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -