घरमहाराष्ट्रअनिल परब यांच्यावर आता सीबीआयचा वॉच

अनिल परब यांच्यावर आता सीबीआयचा वॉच

Subscribe

ईडीतील चौकशी पूर्ण होत नाही तोच केंद्राच्या अखत्यारातील सीबीआयने अनिल परब यांना घेरायचा प्रयत्न सुरू केला आहे. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीनंतर परब यांना सीबीआयने समन्स पाठवले आहे. परब यांनी एक महिन्याची वेळ मागितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सीबीआयने समन्स पाठवल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल परब यांनी या समन्सबाबत एक महिन्याची मुदत मागितली असल्याचे सांगण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदलीप्रकरणी हे समन्स पाठवले असल्याचे कळते. याच प्रकरणात माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि डीजीपींचीही चौकशी करण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र, असे समन्स आल्याच्या वृत्ताचा अनिल परब यांनी इन्कार केला आहे. असे कुठलेही समन्स मला आलेले नाही, असे परब यांनी सांगितले. समन्सच आले नसल्याने वेळ मागण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी गृहमंत्री आणि ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांच्या काळात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. अनिल देशमुख गृहमंत्री असताना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात मनी लॉड्रिंगबाबत सध्या ईडीकडून तपास सुरू आहे. चांदिवाल आयोगासमोरही सध्या या प्रकरणाची चौकशी सूरू आहे. बदल्यांमधून पैसे मिळालेत का, मनी लॉड्रिंग झालंय का, याबाबत चौकशी केली जाते आहे. माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. तसेच राज्याच्या डीजीपींना सीबीआयचे समन्स पाठवण्यात आले होते.

- Advertisement -

समन्स नाही – परब
मात्र अनिल परब यांनी आपल्याला सीबीआयचे कोणतेही समन्स आलेले नसल्याचे म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पोलीस बदली प्रकरणात अनिल परब यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. असे समन्स आले नसल्याचे सांगताना यासाठी वेळ मागवून घेण्याचे कारण काय, अशी विचारणा त्यांनी केली.

बदनामीचा आणखी एक डाव – पटोले
महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करण्याचा भाजपचा डाव असून अनिल परबांना पाठवलेली समन्स हा देखील त्याचाच एक भाग असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातून सत्ता गेल्यानंतर भाजपचे नेते यंत्रणांना हाताशी घेऊन महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी राजकारण करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -