घरमहाराष्ट्रवाझेंच्या साकेत सोसायटीचे DVR जप्त केल्याचं उघड

वाझेंच्या साकेत सोसायटीचे DVR जप्त केल्याचं उघड

Subscribe

सचिन वाझे यांना अडचणीत आणणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. सचिन वाझे यांचं घर असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीमधील दोन डीव्हीआर मनसुख हिरेन यांचा मृत्यू होण्याच्या आधी जप्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मृतदेह मुंब्र्याच्या खाडीमध्ये सापडला. मात्र, साकेत सोसायटीमधले डीव्हीआर २७ फेब्रुवारीला जप्त करण्यात आले आहेत. याबाबतचे पत्रव्यवहार समोर आले आहेत.

CCTV Footage Seized by Sachin Waze’s Team from His Society

- Advertisement -

CCTV Footage Seized by Sachin Waze’s Team from His Society

वाझेंनी तपासादरम्यान अनेक महत्वाचे पुरावे नष्ट केल्याची शक्यता तपास यंत्रणा करत आहेत. दरम्यान, मोठा खुलासे समोर येत आहेत. सचिन वाझेंनी त्यांच्या सोसायटीतील डिव्हीआर २७ फेब्रुवारीलाच काढला होता. २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. पण २७ फेब्रुवारीला सचिन वाझेंनी साकेत कॉम्प्लेक्स या त्यांच्या सोसायटीशी विशेष पत्रव्यवहार करून डीव्हीआर काढला. वाझेंनी हा डीव्हीआर नष्ट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेच्या आधी गाडी चोरीला गेली नसून ती वाझे यांच्याच ताब्यात होती असा संशय आता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

Image

वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भोवणार

सचिन वाझे प्रकरणावरुन पोलीस आयुक्त बदलण्याबाबत कालपासून चर्चा सुरु आहे. दरम्यान, आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यामुळे आता सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी नवी नावं समोर येत आहेत. यामध्ये रजनीश शेठ, सदानंद दाते, विवेक फणसाळकर, जयदीप सिंग, बी. के. उपाध्याय आणि डॉ. के. वेंकटेशन या अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -