घरठाणेमध्य रेल्वेवर कोपर ते ठाकुर्ली दरम्यान शनिवारी मध्यरात्री घेण्यात येणार ब्लॉक, असे...

मध्य रेल्वेवर कोपर ते ठाकुर्ली दरम्यान शनिवारी मध्यरात्री घेण्यात येणार ब्लॉक, असे असेल वेळापत्रक

Subscribe

डीएफसी अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी रेल्वे पूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज (ता. ०८ मार्च) शनिवारी मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

डीएफसी अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी रेल्वे पूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज (ता. ०८ मार्च) शनिवारी मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी काही लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच काही मेल-एक्सप्रेस या उशीराने धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तसेच आज शनिवारी आणि उद्या रविवारी इतर कामांसाठी शॅडो ब्लॉक देखील घेण्यात येणार आहे.

या ब्लॉकमुळे १९ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. यातील काही गाड्या या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) स्थानकात येणाऱ्या गाड्या कल्याण ते कर्जत आणि कसारा यांदरम्यान विविध स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही गाड्या या दोन ते तीन तास विलंबाने धावणार आहेत. यामुळे प्रवासाला निघताना गाड्यांचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

ब्लॉकमुळे गाड्यांचे वेळापत्रक असे असेल, वाचा…
• ठाणे आणि कर्जत/कसारा दरम्यानच्या उपनगरीय सेवा ००.२० ते ०५.०० वाजेपर्यंत बंद राहतील.
• कर्जतच्या दिशेने ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटेल.
• कसाराच्या दिशेने ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.५० वाजता सुटेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ब्लॉकनंतर पहिली लोकल: विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत येथून ०४.१० वाजता सुटणार.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ब्लॉक नंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कसारा येथून ०४.५९ वाजता सुटणार.

तसेच, लांब पल्ल्याच्या गाड्या डाऊन गाड्यांचे नियमन
• 11087 वेरावळ-पुणे एक्सप्रेस भिवंडी येथे १ तासासाठी नियमित केली जाईल
• 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -वाराणसी एक्स्प्रेस आणि 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

- Advertisement -

अप गाड्यांचे नियमन
• 18030 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आसनगाव स्थानकावर ०२.३७ ते ०५.३० या वेळेत नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेच्या १ तास ५० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचेल.
• 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आटगाव स्थानकावर ०२.३८ ते ४.२५ या वेळेत नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेच्या १ तास ४० मिनिटे उशीरा पोहोचेल.
• 20204 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस खर्डी स्थानकावर ०२.५५ ते ४.२५ या वेळेत नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेपेक्षा १ तास ३० मिनिटे उशिरा पोहोचेल.
• 11402 आदिलाबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 12152 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कसारा स्टेशनवर ०३.२३ ते ०४.३० या वेळेत नियमित केली जातील आणि निर्धारित वेळेच्या १ तास ५० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
• 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आणि 12106 गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर ०३.३५ ते ४.२५ या वेळेत नियमित केल्या जातील आणि त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा ५० मिनिटे ते १ तास उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

येणाऱ्या गाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गावरून वळवल्या जातील
• 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• 11140 गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• 22158 चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• 11022 तिरुनेलवेली- दादर एक्सप्रेस
17058 अप देवगिरी एक्सप्रेस,
12618 अप मंगला- लक्षद्वीप एक्सप्रेस,
12138 अप पंजाब मेल शेड्यूलपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचेल आणि सर्व विलंबित मेल/एक्सप्रेस/हॉलिडे स्पेशल ट्रेन ऑपरेशनल आवश्यकतेनुसार नियमित/पुन्हा शेड्युल केल्या जातील. दरम्यान, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉक्ससाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आलेली आहे.


हेही वाचा – शरद पवारांच्या अदानीसंदर्भातील वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -