घरताज्या घडामोडीPawar Modi Meet : सत्तेतून पहिल्यांदा कोण बाहेर पडणार यासाठी 'मविआ'मध्ये चढाओढ,...

Pawar Modi Meet : सत्तेतून पहिल्यांदा कोण बाहेर पडणार यासाठी ‘मविआ’मध्ये चढाओढ, चंद्रकांत पाटलांचा दावा

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही इतके मोठे नेते आहेत की, त्यांच्यातील संवाद आपल्यासारख्या व्यक्तीला कळणे अवघड गोष्ट आहे. त्यामुळेच भाजपकडून जर ऑफर असती, तर ती नाकारण्या इतके राजकीय असंमजस पवार नाहीत. पवार साहेबांचा इतिहास खर बोलण्याचा नाही. पण यावर मी टिप्पणी करणार असेही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले. सत्तास्थापनेच्या दाव्याबाबत दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे फक्त पवारच सांगू शकतात. मोदीजी अशा विषयावर चर्चाही करत नाहीत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या ऑफऱच्या मुद्द्याचा उलगडा केला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या घडामोडी पाहता भाजपसोबत सत्ता स्थापन कोण करणार ? आणि महाविकास आघाडीतून कोण बाहेर पडणार ? याबाबतही चढाओढ सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकारमधून आता बाहेर कुणी पडायच आणि भाजपसोबत सत्ता कुणी स्थापन करायची यासाठीची स्पर्धा सुरू आहे. गेल्या दोन दिवस ते चालले आहे. त्या चढाओढीचे परिणाम म्हणजे गेल्या दोन दिवसातील घटना या पूरक आहेत, असा खळबळजनक दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. कोण बाहेर पडणार आणि कोण भाजपसोबत सत्ता स्थापन करणार यासाठीच ही चढाओढ सुरू असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

एकट्या व्यक्तीने कोणासोबत जावे यासाठीची आमची हुकुमशाही नाही. आमची कोअर कमिटी आहे. केंद्रीय नेतृत्व आणि संसदीय समिती आहे. त्यामुळे एका व्यक्तीला निर्णय घेता येत नाही. त्यामुळे सध्या सत्ता स्थापन करण्यासाठी कोणतीही ऑफर नाही, असाही खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -