घरताज्या घडामोडीकाशीचा घाट दाखवू, मोदींना मारू म्हणजे दहशतवाद सुरू आहे का?, चंद्रकांत पाटलांचा...

काशीचा घाट दाखवू, मोदींना मारू म्हणजे दहशतवाद सुरू आहे का?, चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल

Subscribe

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे तक्रारीसाठी बसले आहेत त्यांना अटक करतील. जर तक्रार दाखल करुन घेतली नाही तर त्यांच्याविरोधात कोर्टात जाऊ आणि कोर्टात हे कोणतीही केस जिंकले नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार काशीचा घाट दाखवतील असे वक्तव्य केलं आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घणाघात केला आहे. काशीचा घाट दाखवू, मोदींना मारु म्हणजे दहशतवाद सुरु आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच राज्यातील भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांविरोधात आणि नाना पटोलेंविरोधात तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच जर तक्रारी घेतल्या नाही तर कोर्टात जाऊ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, नवाब मलिकांनी काल असे म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीसांना पवारांनी कात्रजचा घाट दाखवला आता काशीचा घाट दाखवतील, काशीचा घाट म्हणजे मृत्यू, नाना पटोले म्हणतात मारु म्हणजे काय अंडरवर्ल्ड सुरु आहे की काय? ह्याला मारु त्याला मारु म्हणजे काय बंदूका घेऊन फिरत आहेत का? काय दहशतवाद सुरु आहे आणि कोणाला? असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

- Advertisement -

शरद पवारांना तो पराक्रम करता आला नाही

दरम्यान चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, पाच वर्ष सलग राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस राहिले आहेत. शरद पवारांना हा पराक्रम करता आला नाही तो फडणीसांनी केला आहे. वसंतराव नाईकांनंतर थेट फडणवीसांनी केला आहे. आता ते विरोधी पक्षनेते आहेत त्यांना नवाब मलिक काशीचा घाट दाखवणार आहेत. मला या विषयात भाजपच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांच्याविरोधात तक्रार दाखल केली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या जीवाला काही बरं वाईट झाले. काशी घाटावर गेले तर त्याची सूत्र जे आहेत ती नवाब मलिकांकडे जात आहेत अशा प्रकारची सावधगिरीची तक्रार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे.

ते म्हणाले शरद पवार दाखवणार पंरतु जर वादात जर दोन माणसे असतील तर दोघांवर दाखल करतात. पण ते नवाब मलिक म्हणालेत म्हणून मलिकांवर दाखल केली पाहिजे. काशीचा घाट प्रसिद्ध आहे की, मृत्यूनंतर काशीच्या घाटानंतर विधी झाले तर त्याला स्वर्ग मिळतो असे म्हणतात माझा त्यावर विश्वास नाही. पण केसेस दाखल होऊ ना होऊ रोज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम देत आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे तक्रारीसाठी बसले आहेत त्यांना अटक करतील. जर तक्रार दाखल करुन घेतली नाही तर त्यांच्याविरोधात कोर्टात जाऊ आणि कोर्टात हे कोणतीही केस जिंकले नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ‘मी आणि देवेंद्र फडणवीस शत्रू नाही’ भाजपचं सरकार न येण्यास ते स्वतः जबाबदार, संजय राऊतांचे वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -