PMLA कोर्टाने परमबीर सिंगांच्या आरोपांसंदर्भात देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी चांदीवाल आयोगानं अनिल देशमुखांना दंडही ठोठावला होता. तेव्हा दंडाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. तसेच ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करा, असेही आदेश न्या. के. यू. चांदीवाल यांनी दिला होता.

former home minister anil deshmukh clarification about ed raid

नवी दिल्लीः विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात ही याचिका होती. ती न्यायालयानं फेटाळून लावली. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ज्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केलीय. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी चांदीवाल आयोगानं अनिल देशमुखांना दंडही ठोठावला होता. तेव्हा दंडाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. तसेच ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करा, असेही आदेश न्या. के. यू. चांदीवाल यांनी दिला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. ईडीकडून जवळपास 7 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.


हेही वाचाः ९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय