घरमहाराष्ट्र‘नया है वह’ पार्थ पवारांबद्दल छगन भुजबळांची प्रतिक्रिया

‘नया है वह’ पार्थ पवारांबद्दल छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेली सीबीआय चौकशीची मागणी, राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केलेले कौतुक यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पार्थ यांचे आजोबा शरद पवार नाराज आहेत. पार्थ यांच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असे शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर पार्थ यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना राज्याचे सार्वजनिक वितरणमंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ यांच्यावर ‘नया है वह’ अशी मार्मिक टिप्पणी केली आहे.

शरद पवारांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी पार्थ हे थोडे अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. हिंदीत सांगायचे झाले तर, ‘नया है वह’, असे भुजबळ म्हणाले. आम्हीसुद्धा पवार कुटुंबाचे सदस्य आहोत. अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावले गेलेले नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचे, सुचवण्याचे, समजावण्याचे काम वरिष्ठ माणसे करतच असतात, असे छगन भुजबळ म्हणाले. मीडियाच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

- Advertisement -

‘पार्थ नाट्यावर’राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मी त्यावर काय बोलणार म्हणत त्यांनी हिंदीतही मत मांडले. माजी मंत्री आणि शरद पवारांचे जवळचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांच्या नातवानेही फेसबुक पोस्ट लिहून पार्थ यांचे कौतुक केले आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, कसे लढायचे हे आपल्याला माहीत आहे. तुम्ही जन्मापासूनच योद्धे आहात, हे मी लहानपणापासूनच पाहत आलोय, असे म्हणत मल्हार पाटील यांनी पार्थ यांचे समर्थन केले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांवेळीच माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्याच, राणा जगजितसिंह पाटील यांचे मल्हार हे चिरंजीव आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -