घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhajinagar : थेट टँकरमधून 800 रुपयांत गॅसची चोरी; तीन आरोपींसह 52...

Chhatrapati Sambhajinagar : थेट टँकरमधून 800 रुपयांत गॅसची चोरी; तीन आरोपींसह 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

Subscribe

Chhatrapati Sambhajinagar : बेकायदेशीररित्या विनापरवाना थेट एचपी गॅस टँकरमधून रिफिलिंग करून ते व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणाऱ्या आरोपींविरोधात सातारा पोलिसांनी (Satara Police) छापा टाकून बुधवारी (16 ऑगस्ट) कारवाई केली आहे. यावेळी तीन आरोपींसह 52 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Stealing gas worth Rs 800 directly from tanker 52 lakh worth of goods seized along with three accused)

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लिंक रोड गोलवाडी शिवार येथे माऊली हॉटेलच्या बाजूला एचपी गॅस कंपनीच्या टँकरमधून गॅस चोरून सिलेंडरमध्ये भरला जात होता. त्यानुसार सातारा पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली असताना त्यांना लिंक रोडवर मोकल्या जागेत अंधारात एचपी कंपनीचा टँकर (MH -12-NX –733) दिसला. या टँकरच्या बाजूला मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो (MH-20-EL-0520) उभा होता, ज्यामध्ये व्यवसायिक वापराचे सिलेंडर ठेवलेले होते. आरोपी एलीपजी गॅसने भरलेल्या टँकरच्या पाईपला रबरी नळी लावून नोझलद्वारे बेकायदेशीररित्या गॅस चोरुन व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरताना दिसले. दरम्यान, पोलिसांनी या चोरी प्रकरणी तीन आरोपींनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची थोरल्या पवारांना साथ, आमदारांनी धरला अजितदादांचा हात

जावेदखान मोहम्मद मुनाफ (40) मुंबई, शेख अफसर शेख बाबुमियाँ (35) छत्रपती संभाजीनगर आणि कदीर शेख अब्दुल रज्जाक (35) छत्रपती संभाजीनगर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी यावेळी 52 लाख 68 हजार 883 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देऊन त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले.

- Advertisement -

पुरवठा अधिकाऱ्यांनी तिन्ही संशयित आरोपींकडे विचारपूस केली असता टँकरचालकाने सांगितले की, हा टँकर मुंबईतील गॅस कंपनीतून गॅस भरुन चिकलठाणा येथे एचपी गॅस डेपोमध्ये जात होता. आपण शेख अफसर शेख बाबु व कदीर शेख अब्दुल रज्जाक यांना रिकाम्या व्यवसायिक सिलेंडरमध्ये टँकरमधून 800 रुपयांमध्ये एक सिलेंडर याप्रमाणे गॅस भरुन देत असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – अजित पवार यांना शरद पवारांचा स्पष्ट इशारा, म्हणाले – “कोर्टात खेचेन…”

52 लाख 68 हजार 883 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून 40 लाख रुपये किमतीचा गॅस टँकर आणि त्यामध्ये असलेला 7 लाख 37 हजार 133 रुपये किंमतीचा 20.167 टन गॅस. 12 हजार 250 रुपये किंमतीचे अंदाजे 19 किलो वजनाच्या एलपीजी गॅसने भरलेले 7 व्यवसायिक सिलेंडर, 14 हजार 500 रुपये किंमतीचे रिकामे 29 व्यवसायिक गॅस सिलेंडर, 5 हजार रुपये किमतीची रबरी नळी व नोझल, 5 लाख रुपये किमतीचा टेम्पो असे एकूण 52 लाख 68 हजार 883 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -