घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरअजित पवार यांना शरद पवारांचा स्पष्ट इशारा, म्हणाले - "कोर्टात खेचेन..."

अजित पवार यांना शरद पवारांचा स्पष्ट इशारा, म्हणाले – “कोर्टात खेचेन…”

Subscribe

माझ्या परवानगीशिवाय कोणीही माझ्या फोटो वापरू नये असे शरद पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले होते. परंतु शरद पवार यांच्या या वक्तव्याच्या विरोधात जाऊन अजित पवार गटाकडून आजही त्यांचा फोटो वापरण्यात येतो. त्यामुळे यावर आता शरद पवार यांनी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर : अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडली. ज्यानंतर त्यांनी भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर नेमका हक्क कोणाचा? असा प्रश्न निर्माण झाला. शरद पवार यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला असला तरी खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच आहे, असे वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले नसल्यास दावा देखील करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरण्याचे काम सुरू अद्यापही आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये माझ्या परवानगीशिवाय कोणीही माझ्या फोटो वापरू नये असे शरद पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले होते. परंतु शरद पवार यांच्या या वक्तव्याच्या विरोधात जाऊन अजित पवार गटाकडून आजही त्यांचा फोटो वापरण्यात येतो. त्यामुळे यावर आता शरद पवार यांनी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे. (Sharad Pawar clear warning to Ajit Pawar)

हेही वाचा – Nagpur Bench : स्वातंत्र्यदिनी नागपूर खंडपीठाने दिला आदिवासी विद्यार्थ्याला न्याय

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर येथे काल (ता. 16 ऑगस्ट) शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार गटाला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिलेला आहे. “खबरदार, माझा फोटो वापराल तर कोर्टात खेचेन…” असे स्पष्टपणे आता शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता यापुढे अजित पवार गट शरद पवार यांचा फोटो वापरतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून त्यांचा फोटो वापरण्यात आला तर शरद पवार खरंच न्यायालयीन कारवाई करणार का? असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे

शरद पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि त्यांच्यामध्ये झालेला गुप्त भेटीबाबत स्पष्टपणे माहिती दिली. मी घरातला प्रमुख आहे आणि ज्यामुळे मी कायमच प्रमुख या नात्याने घरातली सदस्यांचा सल्ला घेत असतो आणि कुटुंबात मी वरिष्ठ असल्याने कुणी माझ्याकडून सल्ला घेत असेल, त्यात चुकीचे काय? असा प्रतिप्रश्न सुद्धा शरद पवार उपस्थित करत म्हणाले की, त्याच कारणामुळे मी लपून छपून न जाता अजित पवार यांची भेट घेतल्याचे सर्वांना सांगत असल्याचे विधान शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यानी भाजपवर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या मी पुन्हा येईन वाक्यावरुन पवारांनी देवेंद्र फडणवसींचे मी पुन्हा येईन या वाक्याची आठवण करुन देत, जे असे वक्तव्य करतात ते परत येत नाही, असा टोला भाजपच्या दोन्ही नेत्यांना लगावला. तसेच, 2024 मध्ये मोदी सरकारसाठी अनुकूल अशी देशातील स्थिती नाही. महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथे विद्यमान सरकार पाडून भाजप सत्तेत आली आहे. गोव्यातही त्यांनी आधी तेच केले होते. गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये भाजप बहुमतात आहे. मात्र केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड, हिमाचल प्रदेश, बिहारमध्ये भाजप कूठेच नाही. त्यामुळे मी पुन्हा येईनसाठी अनुकूल स्थिती सध्यातरी नाही. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांची स्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -