घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhajinagar : अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये दिलजमाई; पेढा भरवत वाद...

Chhatrapati Sambhajinagar : अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये दिलजमाई; पेढा भरवत वाद मिटवला

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आज छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात सुरू असलेली धुसफूस संपली आहे. अंबादास दानवे यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेत त्यांना पेढा भरवून दोघांच्या वादाला पूर्ण विराम दिला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Diljamai in Ambadas Danve and Chandrakant Khaire The dispute was settled by filling the straw)

हेही वाचा – Sharad Pawar : लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर; इंडिया आघाडीच्या सभेत पवारांचे मोठे वक्तव्य

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे वादामुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली होती. दोघेही दिग्गज नेते लोकसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक होते. काही दिवसांपूर्वीच अंबादास दानवे म्हणाले होते की, मी पक्षाचा बांधील शिवसैनिक आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणताही उमेदवार दिला तर नुकसान होऊ शकते. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली तरी नुकसान होऊ शकते. माझ्यामुळे चंद्रकांत खैरे पडले असे त्यांनी बोलून दाखवू नये, असा खरमरीत टोला अंबादास दानवे यांनी लगावला होता.

पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याशिवाय अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांचा प्रचार न करता केवळ पक्षाचे काम करू अशी भूमिकाही घेतली. त्यामुळे दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र अंबादास दानवे यांनी माघार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दानवे यांनी खैरेंना शाल आणि बुके दिला. तसेच खैरेंशी चर्चा करताना अंबादास दानवे यांनी त्यांना पेढा भरवत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Mallikarjun Kharge : काँग्रेसच्या खात्यातील पैसे चोरीला गेले; खर्गेंचा भाजपावर निशाणा

अंबादास दानवे यांनी ट्वीट करताना म्हटले की, संभाजीनगर शिवसेना लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीने संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकण्यासाठी मनोकामना केली. याप्रसंगी माझ्यासमवेत शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन, महापौर नंदकुमार घोडेले, रेणुकादास वैद्य, राजेंद्र दानवे, सचिन खैरे व सचिन तायडे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -