घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरअब्दुल सत्तार चले जाओ! गावकऱ्यांनी सत्तारांविरोधात केली घोषणाबाजी, कारण काय?

अब्दुल सत्तार चले जाओ! गावकऱ्यांनी सत्तारांविरोधात केली घोषणाबाजी, कारण काय?

Subscribe

गावकऱ्यांनी 'अब्दुल सत्तार चले जाव'च्या घोषणा दिल्या. काही पोरं तर वाहनांच्यामागे धावत होते. गावकऱ्यांचं हे उग्र रुप पाहून अब्दुल सत्तार यांनी गावातून काढता पाय घेतला.

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोड बोरगाव सावरणी येथे आले होते. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. सोबत त्यांनी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकाही आणल्या होत्या. सत्तार यांचा ताफा गावात येताच संपूर्ण गाव जमा झाला. पोरांनी हुल्लडबाजी करण्यास सुरूवात केली. गावकऱ्यांनी ‘अब्दुल सत्तार चले जाव’च्या घोषणा दिल्या. काही पोरं तर वाहनांच्यामागे धावत होते. गावकऱ्यांचं हे उग्र रुप पाहून अब्दुल सत्तार यांनी गावातून काढता पाय घेतला. पण सत्तारांच्या गावबंदीचं नेमकं कारण काय? ते पाहूया. (Chhatrapati Sambhajinagar Go back Abdul Sattar The sillod villagers raised slogans against the authorities )

बोरगाव सावरणी या गावातील लोकांनी सत्तार यांनी गावात येऊ दिलं नाही. चले जावच्या घोषणा दिल्या. त्यांना अक्षरश: हुसकावून लावलं. त्याला कारणही तसंच आहे. या गावात काही दिवसांपूर्वी दोन मुस्लिम महिलांचा मृत्यू झाला होता. या महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणात सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे पारदर्शक चौकशी होत नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. त्या रागातून सत्तारांना गावात येण्यापासून रोखण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

तर, काही ग्रामस्थांच्या मते या महिलांच्या मृत्यूप्रकरणात सत्तार यांनी लक्ष घातलं नाही. गावकऱ्यांनी पोलिसांकडे या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करण्याची मागणी केली होती. तसंच या प्रकरणाचं सत्य बाहेर आणण्याचीही विनंती केली. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. सत्तार यांनीही लक्ष दिलं नाही. त्यामुळेच सत्तार यांना हुसकावून लावल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अब्दुल सत्तार यांना गावात येण्यापासून रोखण्यात आल्याची चर्चा संपूर्ण सिल्लोड तालुक्यात पसरली. सोशल मीडियावरूनही सत्तार यांना गावातून हुसकावून लावल्याचीच चर्चा होत आहे.

(हेही वाचा: मुख्यमंत्री केवळ भाजपला दिलेला शब्द पाळतात; राऊतांचा टोला)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -