घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSambhajinagar : मालकाच्या बेपर्वाईने दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा...

Sambhajinagar : मालकाच्या बेपर्वाईने दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Subscribe

शहरातील छावणी परिसारत बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आगीच्या घटनेप्रकरणी कापड दुकानाचा मालक शेख अस्लम हा दोषी आढळला आहे. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसारत बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आगीच्या घटनेप्रकरणी कापड दुकानाचा मालक शेख अस्लम हा दोषी आढळला आहे. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Chhatrapati Sambhajinagar Store fire due to owners negligence 7 killed A case of culpable homicide has been registered)

हेही वाचा – Politics : …शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिला; बारामतीचा पेच पुन्हा वाढला?

- Advertisement -

कापड दुकानाचा मालक शेख अस्लम याने थकबाकी न दिल्याने त्याचे मीटरचे कनेक्शन तोडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर शेख अस्लम याने दुकानामध्ये अत्यंत बेजबाबदारपणे बोगस वायरचा वापर करून घरगुती मीटरवर संपूर्ण दुकान आणि घरात विजेचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन तास पाहणी करून त्यासंदर्भात रिपोर्ट सादर केला आहे.

महावितरणचे तज्ज्ञ आणि अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त करताना म्हटले की, अस्लमने त्याची ई-बाइक चार्जिंग करण्यासाठी लावली होती. शिवाय, मध्यरात्री 2 वाजेपर्यंत कपड्याच्या दुकानातील कपडे शिवण्याच्या चार मशीन, ओव्हरलॉकची मशीन सुरू होती. त्यामुळे विजेचा दबाव वाढून शॉर्टसर्किट झाला आणि त्यामुळे आग लागली. त्यामुळे आता शेख अस्लमवर 7 जणांच्या मृत्यूचा ठपका ठेवण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांनीच सरकारी पक्षातर्फे फिर्यादी होत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळत राजू शेट्टींकडून ‘एकला चलो रे’चा नारा; कारणंही स्पष्ट केलं

दरम्यान, आग लागलेल्या तीन जमली इमारतीत एकूण 16 जण राहत होते. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते. आगीच्या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष आणि तीन महिलांसह 2 लहान चिमुकल्यांचाही समावेश आहे. हमीदा बेगम (50), शेख सोहेल (35), वसीम शेख (30), तन्वीर वसीम (23), रेश्मा शेख (22), आसिम वसीम शेख (3) आणि परी वसीम शेख (2) यांचा मृत्यू झाला आहे.  तर आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -