घरमहाराष्ट्र'मीसुद्धा आज फार खूश' असं म्हणत अखेर संभाजीराजेंचं उपोषण मागे

‘मीसुद्धा आज फार खूश’ असं म्हणत अखेर संभाजीराजेंचं उपोषण मागे

Subscribe

विशेष म्हणजे राजेंनी औषध घेण्यास नकार दिला असल्यामुळे काळजी वाढली होती. डॉक्टरांच्या टीमने तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांनी औषध देण्याचा प्रयत्न केला, परंतु उपोषणावर ठाम असल्यामुळे राजेंनी स्पष्ट नकार दिला होता.

मुंबईः गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी अखेर उपोषण मागे घेतलेय. संभाजीराजेंच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असून, संभाजीराजेंनी उपोषण स्थगित केलंय. संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरू होता. पण त्याचदरम्यान संभाजीराजेंची तब्येत खालावली होती. त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. तसेच साखरेची पातळीतही घट झाली होती.

विशेष म्हणजे राजेंनी औषध घेण्यास नकार दिला असल्यामुळे काळजी वाढली होती. डॉक्टरांच्या टीमने तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांनी औषध देण्याचा प्रयत्न केला, परंतु उपोषणावर ठाम असल्यामुळे राजेंनी स्पष्ट नकार दिला होता. अखेर उपोषणस्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आणि त्यांनी संभाजीराजेंची मनधरणी केली. त्यानंतर ठाकरे सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यात. मग संभाजीराजे छत्रपतींनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत उपोषण मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. ठाकरे मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. त्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.

- Advertisement -

ते म्हणाले की, आता आपल्या घरचा कार्यक्रम आहे. माझ्या चेहऱ्यावर आता हास्य आलं असून, मीसुद्धा फार खूश आहे. पुढे काय होणार आहे, याची मलाही कल्पना नव्हती. पहिल्यांदाच माझ्या आभाराचं मनोगत आहे. मराठा संघटना आहेत, ज्या इथे उपस्थित आहेत, काही मला मागून नेहमी सपोर्ट करतात, आतापासून नाही, 2007 पासून मी माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढलाय. तसेच मला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो. मी कोणाची नावं घेत नाही, पण सगळ्या संघटनांनी माझ्यावर प्रेम केलंय. त्या सगळ्या संघटनांनी मला ताकद दिलीय, असंही संभाजीराजे म्हणालेत.

त्या मराठा संघटनांनी दाखवून दिलं की, मी खऱ्या अर्थाने शिवशाहूंचा वंशज आहे. त्या सगळ्या संघटनांनी सांगितलं, राजे तुम्ही फक्त कोल्हापूरसाठी मर्यादित राहायचं नाही. महाराष्ट्र आणि देशापर्यंत शिवाजी आणि शाहू महाराजांचं नाव नेण्याची तुमची जबाबदारी आहे. शाहू महाराज हे नुसते कोल्हापूरसाठी नाहीत. शिवाजी महाराज हे नुसते महाराष्ट्रासाठी नाहीत. यांचे आचार-विचार हे देशात आणि जगात गेलेले आहेत. पण तुमची ती जबाबदारी आहे. म्हणून मी खासदार झाल्यावर अनेक लोकांनी टीका केली. पण माझी पूर्ण खासदारकी ही समाजासाठी आणि विकासासाठी मी लावली, असंही संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलंय.

- Advertisement -

इतिहासात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात पार्लामेंटमध्ये कोणी विषय मांडला नव्हता. मी सुरुवात केली आणि अनेक खासदारांनी त्यांच्या त्यांच्या परीनं आरक्षणाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या खासदारांचाही मी आभार व्यक्त करतो. मला सर्व मराठा समाजाचा आभार व्यक्त करायचा आहे. सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केले, नुसती मराठी समाजानं मागणी केली नाही. सर्व बहुजन समाजसुद्धा मराठा आपला मोठा बांधव आहे, या भावनेनं पाठीमागे उभा राहिला, असंही संभाजीराजेंनी अधोरेखित केलंय.

आ’मरणचा’ माझा निर्णय होता, मी घरच्यांना विचारलं नाही, माझी हिंमत झाली नाही. मी माझ्या आई-वडिलांनाही सांगितलं नाही. मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर वडिलांना फोन करायचंही माझं धाडस झालं नाही. वडील असल्यानं ते मला चुकीचा निर्णय घेतल्याचं सांगतील. म्हणून मी वडिलांशी 10 ते 12 दिवस बोललो नाही. आंदोलनाच्या दिवशी सकाळी 8 वाजता मी त्यांना फोन केला. जिथे अन्यायाच्या विरोधात लढा द्यायचा आहे तिथे आम्ही लढणारच आहोत. तेव्हा वडील म्हणाले, माझ्या आशीर्वादाची काय गरज आहे, तुम्हाला महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. तुला मराठा आणि बहुजन समाजाचा आशीवार्द आहे, असंही त्यांनी सांगितलं.


हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांच्या भेटीचा पुरावाच नाही, सुप्रिया सुळेंनी राज्यपालांचा दावा काढला खोडून

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -