घरदेश-विदेशमॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, फडणवीसांचा देशाबाहेरील 'असा' चौथा कार्यक्रम

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, फडणवीसांचा देशाबाहेरील ‘असा’ चौथा कार्यक्रम

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आलंय.

Mauritius Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आलंय. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ (Pravind Kumar Jugnauth) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.

मॉरिशस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संबंध देखील या पुतळा अनावरण सोहळ्यातून वृद्धींगत झाले आहेत.
मॉरिशसमधील मराठी मंडळ फेडरेशनला महाराष्ट्र सरकारकडून भरघोस निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र भवनाच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने 8 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. मॉरिशसमधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्यासोबत सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असंही त्यांनी घोषित केले.

- Advertisement -

या कार्यक्रमाला मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू (Alan Ganoo), मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला (Nandini Singala), मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भाषिक यावेळी पारंपारिक पोषाखात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

फडणवीसांचा देशाबाहेर चौथा कार्यक्रम
भारतीय महापुरुषांचा देशाबाहेर सन्मान होणं आणि त्यासाठी राज्याच्या प्रमुख नेत्याची उपस्थिती असणं, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा चौथा कार्यक्रम आहे.
१) लंडन : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे स्मारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिक्षण घेत होते, तेव्हा ते ज्या घरात किरायाने राहात होते, ते घर महाराष्ट्र सरकारने खरेदी केले असून तिथे स्मारक उभारण्यात आले आहे.
२) जपान : कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला. या कार्यक्रमालाही फडणवीस उपस्थित होते.
३) रशियात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या पुतळ्याचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. अण्णाभाऊ साठेंवर कम्यूनिस्ट विचारांचा प्रभाव होता. त्यांचे साहित्य हे रशियातही लोकप्रिय आहे.


४) शुक्रवारी मॉरिशस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण कार्यक्रमासाठीही फडणवीस उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सादर करण्यात आले. यात गोंधळ, शेतकरी नृत्य, पोवाडा, इत्यादी मराठी प्रकारांचा समावेश होता.

महाराष्ट्रासाठी अभिमान आणि भावनात्मक दिवस
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस अतिशय भावनात्मक दिवस आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे उभारण्यात आला, याबद्दल मी मॉरिशसच्या पंतप्रधान आणि येथील मराठी समुदायाचा आभारी आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 12 कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -