घरमहाराष्ट्रमुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १४३ कोटींची संपत्ती

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १४३ कोटींची संपत्ती

Subscribe

स्वत:च्या मालकीचे एकही वाहन नाही, मातोश्रीसह दोन बंगले आणि फार्महाऊस

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे हिंदू एकत्रित कुटुंबानुसार अंदाजे १४३ कोटी २७ लाखांची संपत्ती असल्याची माहिती सोमवारी उघडकीस आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्री बंगल्यासह मातोश्रीच्या अगदी समोर बांधले जात असलेले आलिशान सात मजली घर आणि कर्जत येथे असलेले ठाकरे यांचे फार्म हाऊस यांचा समावेश आहे. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी दाखल केलेल्या आपल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीसह एकत्रित संपत्तीचे विवरण दिले आहे. यामध्ये बँकेत १० कोटी ३६ लाखांच्या ठेवी, ६४ लाख ५५ हजारांचे दागिने, बॉन्ड्स आणि शेअर्समध्ये २० लाख ३९ हजार, इतर १० लाख २२ हजार, ३.५ कोटींची स्थावर मालमत्ता मिळून ११. ३८कोटी होतात.

मंत्री आदित्य ठाकरेंची संपत्ती ११ कोटी ३८ लाखांची

आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आई रश्मी ठाकरे, भाऊ तेजसही उपस्थित होते. आदित्य यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

- Advertisement -

एकूण किती केसेस?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात एकूण 23 तक्रारी असून ज्यामधील 12 रद्द झाल्या असून बाकीच्या खासगी तक्रारी आहेत. केवळ एकच प्रकरण सध्या त्यांच्या नावावर आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयाबाहेर राडा झाला होता. आजही त्याची नोंद ठाकरेंच्या नावावर आहे.

मुख्यमंत्री ठाकरे करतात नोकरी तर पत्नी रश्मी उद्योजक

उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात आपण नोकरी करत असून पत्नी रश्मी व्यवसाय करीत असल्याचे म्हटले आहे. विविध कंपन्यांचे समभाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. इतके जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात त्यांना विधिमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. उद्धव ठाकरे हे आता विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मुंबईत सादर केला. ज्यामध्ये त्यांनी आपली संपत्ती सुमारे १२५ कोटी असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

मालमत्तेची विभागणी पुढील प्रमाणे – 

जंगम मालमत्ता

स्वतः – २४.१४ कोटी
पत्नी – ३६.१६ कोटी
दोघांची मिळून – १.५८ कोटी

एकूण – ६१.६८ कोटी

स्थावर मालमत्ता

स्वतः – ३७.९३ कोटी
पत्नी – २८.९२ कोटी
एकूण – ६६.८५ कोटी

वारसाहक्काने आलेली मालमत्ता – १४.५० कोटी

एकूण संपत्ती – १४३ कोटी

कर्ज

स्वतःवर – ४.०६ कोटी
पत्नी – ११.४४ कोटी

उद्धव ठाकरे यांच्याकडे वांद्रे येथील मातोश्री बंगल्याचा ७५ टक्के भाग आहे.

उत्पन्नाचे साधन – पगार, व्याज, लाभांश आणि भांडवल नफा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -