घरमहाराष्ट्रगृहराज्य मंत्र्यांची दहशत विरोधकांवर नाही तर गुंडावर, बलात्काऱ्यांवर असावी; चित्रा वाघ यांची...

गृहराज्य मंत्र्यांची दहशत विरोधकांवर नाही तर गुंडावर, बलात्काऱ्यांवर असावी; चित्रा वाघ यांची टीका

Subscribe

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघीड सरकारने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. दरम्यान काल भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरात आलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दगडफेकीची घटना घडली आहे. सभा सुरु असताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. कोल्हापूर शहरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील जाहीर सभेत हा प्रकार घडल्याचे समोर आला आहे. या घटनेसंदर्भात आज चित्रा वाघ यांनी कोल्हापूरचे एसपी यांचे भेट घेतली. तसेच रितसर लेखी फिर्याद नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी गृहराज्य मंत्र्यांची दहशत विरोधकांवर नाही तर गुंडावर आणि बलात्काऱ्यांवर असावी अशा शब्दात कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “दहशत ही गुंडांवर असावी, बलात्काऱ्यांवर असावी, आमच्यावर आणि कोल्हापूर जनतेवर अजिबात नसावी. पोलिसांना मी लेखी तक्रार देणार आहे. या घटनेसंदर्भातील माहिती काही तासांमध्ये आणि दिवसांमध्ये उपलब्ध होईल.

- Advertisement -

गृहराज्य मंत्र्यांची दहशत विरोधकांवर नाही तर गुंडावर आणि बलात्काऱ्यांवर असावी. काल मी आकडेवारी सांगितले कशापद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचे थिंडवडे महाराष्ट्रात निघालेच आहेत. पण ज्या कोल्हापूर शहर, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या गृहराज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. याचा घोषवारा तुम्हाला वाचून दाखवला, आणि आज दुपारी ३ वाजता यावर सविस्तर बोलू या. असा चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

कोल्हापूरातील मुक्त सैनिक वसाहतीमध्ये भाषण सुरु असताना काही अज्ञातांकडून दगड मारण्यात आली. यासंदर्भात आज कोल्हापूरचे एसपी यांचे भेट घेतली. त्यांनी देखील या घटनेला पुष्टी दिली आहे. पोलिसही याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या माहितीनुसार, घटनास्थळी माझ्यावर दगडी मारण्यात आली होती. ती कोणाकडून मारण्यात आली, कोण ती माणसं होती? या प्रकरणाचा तपास, चौकशी कोल्हापूरचे पोलीस करत आहेत. ज्यांनी कोणी हे काम केले ते निश्चितपणे पकडली जातील. असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्ते केला आहेय.

- Advertisement -

कुठल्याही निवडणुकीत अशा घटना घडणे निंदनीय आहे. माझ्यासारख्या हजारो महिला ज्या विविध पक्षाच्या प्रचारांमध्येकाम करत असतात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरत असताना कोल्हापूरात हा जो कालचा प्रकार घडला तो पहिल्यांदाच घडला आहे. ज्यांनी कोणी हा प्रकार केला त्यांचा जाहीर निषेध चित्रा वाघ यांनी केला आहे. दरम्यान ट्विटरवरून देखील चित्रा वाघ यांनी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारासाठी रविवारी भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थि होत्या. शहरातील मुक्त सैनिक वसाहत आणि राजारामपुरी येथे ही जाहीर प्रचार सभा झाली. मात्र या सभेदरम्यान काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली असा आरोप त्यांनी केला आहे.


‘शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे’; आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मनसे नेते संदीप देशपांडेंचे प्रत्युत्तर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -