घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगरमधील घटनेवर चित्रा वाघ यांनी व्यक्त केले मत, म्हणाल्या...

छत्रपती संभाजीनगरमधील घटनेवर चित्रा वाघ यांनी व्यक्त केले मत, म्हणाल्या…

Subscribe

छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या काही तरूणांच्या टोळक्याकडून एका तरूणीला त्रास देण्यात आला. त्या तरूणीला त्रास देणारे तरूण हे तिच्याच ओळखीतले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भाजपच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या काही तरूणांच्या टोळक्याकडून एका तरूणीला त्रास देण्यात आला. त्या तरूणीला त्रास देणारे तरूण हे तिच्याच ओळखीतले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधल्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणी भाजपच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. तर याबाबत त्यांनी एक व्हि़डीओ आपल्या ट्वीटरला पोस्ट करत या घटनेचा निषेध केला आहे.

हेही वाचा – विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा : मंगलप्रभात लोढा

- Advertisement -

“छत्रपती संभाजीनगरमधे काही टवाळखोरांनी दुपारची वेळ साधून कॅालेजहून परतणाऱ्या तरूणीला भररस्त्यात अडवून तिचा मोबाईल हिसकावून घेत तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गंभीर आहे पण वर्दळीचा रस्ता असतानाही आसपासची सर्व माणसं फक्त बघ्यांच्या भूमिकेत होती हे देखील धक्कादायकच आहे मात्र या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी सतर्कता दाखवत तात्काळ sue Moto कारवाई केली आणि एका तरूणाला ताब्यात घेतलं इतर सर्व आरोपी ही पकडले जातीलचं आणि भविष्यात अशा घटना घडणारच नाही अशा पद्धतीने ह्या हिंसक प्रवृत्तींना चाप लावला जाईल यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे कारण सरकारची नीती आणि नियत स्पष्ट आहे. महिलांची छेड काढणाऱ्यां विरोधात झिरो टॅालरन्स पॅालिसी राबविणारे गृहमंत्री @Dev_Fadnavisजी यांचे यासाठी आभार आणि अभिनंदन. अशा घटनांमध्ये प्रसंगावधान दाखवून महिलांच्या अतिप्रसंगाच्या काळात त्यांच्या सोबत उभं राहणं ही जितकी सरकारची जबाबदारी आहे तितकीच सुजाण नागरिक म्हणून तुम्हा-आम्हा सर्वांचीच आहे तरच अशा कृत्यांसाठी ही माथेफीरू टोळी धजावणार नाही व या विकृतीला चाप बसेल.” असे म्हणत चित्रा वाघ यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरमध्ये येथे एक तरूणी तिच्या मित्रासोबत बिबी-का-मकबरा पाहण्यासाठी गेली होती. यावेळी त्याठिकाणी तिच्याच ओळखीच्या काही तरूणांनी तिला त्या मुलासोबत फिरताना पाहिले. पण तो मुलगा हिंदू असल्याने आणि मुलगी मुस्लीम असल्याने त्या तरूणांनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. या घटनेच्यावेळी तरूणीच्यासोबत असलेल्या तरूणाने घाबरून घटनास्थळावरून काढला. ज्यानंतर ही तरूणी एकटीच त्या तरूणांच्या तावडीत सापडली. ज्यानंतर या टवाळखोर तरूणांनी त्या मुलीचा स्काफ (हिजाब) खेचत तिच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

तसेच हे प्रकरण आपापसांतील असल्याने तरूणीच्या पालकांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना 24 एप्रिलला घडली असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेतली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर सदर तरूण हे तरूणीच्या बाजूलाच राहणारे असून तिच्या ओळखीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा नोंदवला जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -