घरदेश-विदेशLive updates : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द

Live updates : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द

Subscribe

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द

दौरा रद्द झाल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

- Advertisement -

राज्यभरात आज 784 कोरोना रुग्णांची नोंद


मनसेच्या अविनाश जाधव यांना पुन्हा मुंब्र्यात बंदी

- Advertisement -

9 मेपर्यंत प्रवेशबंदी

मशिदीवरील लाऊडस्पीकर बंदीबाबत उठवला होता आवाज


बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात अहमदाबाद कोर्टात याचिका दाखल

गुजराती लोक हे फसवणूक करणारे आणि धूर्त असतात, असे केले होते वक्तव्य


दरे गावातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याकडे रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपुरात घेणार अमित शाहांची भेट


दौंडमधील वरंवडकडे जाताना संजय राऊतांना पोलिसांनी अडवले

भीमा पाटस सारखान्याच्या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत घेणार सभा


घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड; मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी केली आहे. मेट्रोमधील  बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो प्रशासनाने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षली हल्ल्यात डीआरजीचे ११ जवान शहीद झाले आहे


मुंबई-अहमदाबाद मार्गावरील कंटनेरला भीषण आग


एमसीडी निवडणुकीत ‘आप’च्या शैली ओबेरॉय यांची महापौर पदी निवड

म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली (एमसीडी)च्या महापौर पदी आम आदमी पक्षाकडून शैली ओबेरॉय महापौर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवला यांनी शैली ओबेरॉय यांना महापौर पदी विराजमान झाल्याबद्दल ट्वीट करत शुभेच्छा दिले आहेत.


कोणताही प्रकल्प होत असताना लोकांना विश्वासात घेतले पाहिजे – शरद पवार

कोणताही प्रकल्प होत असताना लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. बारसू रिफायनरीवर चर्चा व्हायला पाहिजे. बारसूतील विरोधकांसोबत , असे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हणाले


शरद पवार वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये पत्रकारांशी संवाद साधणार आहे.


बारसूतील आंदोलनकांना भेटण्यासाठी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत जाणार होते.


बारसू रिफायनरीसंबंधातील माहिती शरद पवारांना दिली – उदय सामंद

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान बारसू रिफायनरीसंबंधातील माहिती शरद पवारांना माहिती दिली आहे, असे उदय सामंतांनी माध्यमांना सांगितले.

 


सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे ( व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला.


शरद पवार आणि उदय सामंत यांची भेट रद्द

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार होते. परंतु, शरद पवार आणि उदय सामंत यांची भेट रद्द करण्यात आली आहे. बारसू रिफायनरी प्रकरणी उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे.


दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोडला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोडला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.


राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शरद पवार यांना भेटणार


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून २ दिवसीय नागपूर दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आली आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच अमित शहा आणि आरएसएसचे सरसंघाचालक मोहन भागवत उद्या एकाच मंचावर उपस्थित असणार आहे.

 


५५ वर्षाहून अधिक वय असलेले मुंबईतील वाहतूक हवालदार दुपारच्या वेळेत ऑफ ड्युटी

मुंबईत वाहतूक दलातील ५५ वर्षाहून अधिक वयमध्ये आरोग्याच्या समस्य आसलेल्या वाहतूक पोलीस हवालादर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत रस्त्यावर ऑफ ड्युटी राहणार आहेत. यासंदर्भात मुंबई वाहतूक विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.


राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊसाची हजेरी

राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


मानहानी प्रकरणी राहुल गांधींची सुरत हायकोर्टात धाव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानी प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे राहुल गांधींनी सुरत हायकोर्टात धाव घेतली आहे.


पंजाबचे माजी मुख्यमंत्री व अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल यांचे निधन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख नेते प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी निधन झाले. प्रकाश सिंग बादल हे ९५ व्या वर्षांचे होते. एक आठवड्यापूर्वी प्रकाश सिंग बादल यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात आले होते. प्रकाश सिंग बादल यांच्यावर आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -