घरमहाराष्ट्रसंजय राठोडांना क्लीनचिट का दिली हे उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटलांना विचारा;...

संजय राठोडांना क्लीनचिट का दिली हे उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटलांना विचारा; चित्रा वाघ

Subscribe

शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना क्लीनचीट कोणी दिली? आमचं सरकार तर आत्ता आलं. त्यामुळे याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुण्याचे त्यावेळचे आयुक्त अमिताभ गुप्ता जे आजही सर्विसमध्ये आहेत यांना विचारास अशी स्पष्ट भूमिका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मांडली आहे. संजय राठोड यांना क्लीनचीट का दिली, याचे उत्तर या तिघांनाच विचारा असंही चित्रा वाघ यांनी म्हटले. संजय राठोड यांना तत्कालीन सरकारने क्लीनचीट दिली म्हणून आत्ताच्या सरकारने त्यांना मंत्रीपद दिलं, असही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं.

संजय राठोडांविरोधात रस्त्यावरची लढाई होती ती तेव्हाही लढली, न्यायालयात गेली. न्यायालयातही केस दाखल केली आहे. त्यांना मंत्री करत असताना माझी भूमिका मी मांडली आहे, माझी लढाई संपलेली नाही हे मी तेव्हाही बोलले आजही बोलली. यात त्यांना मंत्री पद यासाठी दिलं कारण त्यांना क्लीनचीट मिळाली होती. तरीही माझा विरोध अद्याप कायम आहे, असही चित्रा वाघ यांनी सांगितले.

- Advertisement -

कोणता धर्म सांगतो असं उघडं नागडं फिरा?

यावेळी विरोधकांवर निशाणा साधत चित्र वाघ म्हणाल्या की, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात की, उर्फी जावेद त्या धर्माची आहे म्हणूनच ती चित्रा वाघ यांना दिसली. यात धर्माचा काय संबंध? कोणता धर्म सांगतो असं उघडं नागडं फिरा? उर्फी जावेद ज्या धर्माची आहे, त्या धर्मातील फिजाबवरून भांडण करत आहेत. इथे विषय धर्माचा नाही तर विकृतीचा आहे. ती कोणत्या धर्माची व्यक्ती आहे हे महत्त्वाचं नाही ती कोण व्यक्ती आहे हे महत्वाचं नाही माझा विरोध तिला किंवा तिच्या धर्माला आहे. माझा विरोध फक्त उर्फीच्या नंगा नाचाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी उर्फीचा जो नंगा नाच आहे तो बंद झाला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.


MPSC विद्यार्थ्यांचे आज राज्यभरात आंदोलन, नव्या परीक्षा पॅटर्नविरोधात उतरले रस्त्यावर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -