Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND VS NZ : भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; 'या' दिवशी होणार...

IND VS NZ : भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; ‘या’ दिवशी होणार पहिला सामना

Subscribe

श्रीलंकेनंतर भारतात न्यूझीलंडचा संघ दौऱ्यावर येणार आहे. भारताविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे.

श्रीलंकेनंतर भारतात न्यूझीलंडचा संघ दौऱ्यावर येणार आहे. भारताविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील टी-20 मालिकेला 27 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. (new zealand t20 squad announced for india series mitchell santner captain)

15 सदस्यीय संघात कर्णधार केन विल्यमसन आणि वेगवान गोलंदाज टीम साऊथी यांचा समावेश नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेसाठी डावखुरा मध्यमगती गोलंदाज बेन लिस्टर आणि हेन्री शिपली यांची संघात निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी फिरकी अष्टपैलू मायकेल रिप्पनलाही संघात स्थान मिळाले आहे. रिप्पनने गेल्या वर्षीच्या युरोपियन दौऱ्यावर स्कॉटलंडविरुद्ध पदार्पण केले होते, त्यानंतर तो संघाबाहेर होता.

- Advertisement -

T20I मालिकेसाठी न्यूझीलंड संघ :

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.

- Advertisement -

वनडे मालिका

  • पहिला एकदिवसीय – 18 जानेवारी, हैदराबाद
  • दुसरी वनडे – 21 जानेवारी, रायपूर
  • तिसरी एकदिवसीय – 24 जानेवारी, इंदूर

टी-20 मालिका

  • पहिला T20 – 27 जानेवारी, रांची
  • दुसरा T20 – 29 जानेवारी, लखनौ
  • तिसरा T20 – 1 फेब्रुवारी, अहमदाबाद

सध्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी 12 जानेवारी कोलकाता येथील ईडन गार्डन खेळला गेला. भारतीय संघाने 4 गडी राखत शानदार विजय मिळवला आणि यासह मालिकाही 2-0 ने खिशात घातली.

या सामन्यात भारताचे पहिल्या 15 षटकात 4 गडी बाद करत अडचणीत आणले. पण के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी 75 धावांच्या भागीदारीने विजय मिळवून दिला. के. एल. ने दमदार अर्धशतक केले. तो 64 धावा करून नाबाद राहिला. कुलदीप यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.


हेही वाचा – ‘हिंदकेसरी’ अभिजीत कटकेच्या प्रशिक्षणासाठी भानगिरेंनी दिला 2 लाखाचा धनादेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -