घरताज्या घडामोडी'चोरीचा मामला सेना भवनात बोंबला', वीज चोरीवरुन चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर...

‘चोरीचा मामला सेना भवनात बोंबला’, वीज चोरीवरुन चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

Subscribe

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वीज चोरीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. नागपुरात झालेल्या शिवसेनेच्या सभेसाठी वीज चोरी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. यावरुन चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत चोरीचा मामला सेना भवनात बोंबला अशी टीका केली आहे. वीजेवरुन आता राज्यात सत्ताधारी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे. वीज टंचाईमुळे राज्यात भारनियमन सुरु आहे. परंतु शिवसेनेच्या सभेला वीज चोरी करण्यात आल्यामुळे भाजपकडून टीका करण्यात येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूर दौरा केला. नागपुरात शिवसेनेनं सभेचं आयोजन केले होते. या सभेसाठी वीज चोरी करण्यात आली होती. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. गुरुवारी नागपुरात शिवसेनेच्या सर्वज्ञानींची भरलेली सभा चोरीच्या विजेतून झाल्याचं समोर आलं आहे. आता पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव केली जात आहे. चोरीचा मामला सेनाभवनातच बोंबला अशी टीका चित्रा वाघ यांनी केला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

नागपूरमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांची गजानन परिसरात सभा पार पडली. या सभेच्या मंचाच्या बाजूला विजेचा खांब आहे. विजेच्या खांबावरील वीज आकडे टाकून वीज चोरी केली असल्याची घटना घडली आहे. परंतु वीज चोरी केली नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केलं आहे. सभास्थळाागे गजानन महाराजांचे मंदिरत होते. त्या मंदिरातील संचालकांच्या परवानगीने वीज पुरवठा घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. यावरुनच आता विरोधकांनीसुद्धा शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मातोश्रीवर येण्याची कोणाची हिंमत नाही तुम्ही घरी जा, मुख्यमंत्री ठाकरेंची शिवसैनिकांना विनंती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -