घरठाणेपोद्दार स्कूलच्या व्यवस्थापनाकडून सीआयई बोर्ड बंदचा निर्णय

पोद्दार स्कूलच्या व्यवस्थापनाकडून सीआयई बोर्ड बंदचा निर्णय

Subscribe

पालकांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन

कल्याण । कल्याण पश्चिमेकडील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या कल्याण शाखेत चालविली जाणारे सीआयई (cambridge international school ) बोर्ड बंद करण्याचा शाळा प्रशासनाचा निर्णय ऐकताच पालकांसह विद्यार्थ्याच्या पायाखालची वाळू सरकली. सोमवारी सकाळी पालकांना सोशल मिडीयावर मेसेज पाठवून मिटिंगसाठी बोलावून घेतले व पालकांसमोर हे बोर्ड बंद केले जात असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले.

पोद्दार इंटरनॅशनल शाळेची फी भरताना शाळा व्यवस्थापक कोणत्याही प्रकारे तडजोड न करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी शाळा प्रशासन खेळ करत असल्याचा आरोप करत पालकांनी शाळा प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली.काही पालकांनी शाळाबाहेरील रस्त्यावर बसून शाळेचा निषेध नोंदवला.याबाबत शाळा प्रशासनाने सीआयई बोर्ड बंद करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थी पालकांचे त्यांनी म्हणणे ऐकून घेतले आहे . येत्या गुरुवारी याबाबत मीटिंग ठेवण्यात आली आहे तेव्हा शाळा प्रशासनाचे पदाधिकारी व पालक मिळून तोडगा काढण्यात येईल तसेच शाळा व्यवस्थापनाकडून शाळा बंद होणार नाही शाळा सुरूच राहील असे सांगण्यात आले.

- Advertisement -

कल्याणातील पोदार शाळेत मागील काही वर्षापासून सुरु असलेले सीआयई बोर्ड बंद करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला असून आज पालकांना शाळेत बोलावून याची माहिती देण्यात आली. मात्र यामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी शाळेत गोंधळ घालत प्रशासनाने हा एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली. शाळेच्या प्रवेशद्वारावर पालकांनी गर्दी केली होती. आपल्याकडून भरमसाठ फी आकारली जाते मात्र आता बोर्ड बंद करण्याचा निर्णय घेत शाळेने २० टक्के फीचा परतावा देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र आम्हाला पैसे नकोत तर शिक्षण हवे असल्याचे सांगतानाच आमच्या मुलावर होणार्या अन्याया विरोधात सर्व शाखामधील पालकांनी पाठिबा देत शाळा प्रशासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे अशी मागणी त्रस्त पालकांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -