घरमहाराष्ट्रहवेतील कार्बनडाय ऑक्साईडमुळे वातावरणात बदल - कदम

हवेतील कार्बनडाय ऑक्साईडमुळे वातावरणात बदल – कदम

Subscribe

प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच ३५ लाख कापडी पिशव्या बाजारात येतील. त्याचबरोबर २५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज 'वर्तमानातील प्रदूषण आव्हान आणि उपाययोजना' या विषयावरील चर्चासत्रात सांगितले आहे.

हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने वातावरणात बदल होत असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. तसेच प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच ३५ लाख कापडी पिशव्या बाजारात येतील. त्याचबरोबर २५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्तमानातील प्रदूषण आव्हान आणि उपाययोजना’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विवांता ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एकतरी झाड दत्तक घेऊन ते जगवले पाहिजे

हवामान बदलामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. भूकंप, महापूर, त्सुनामी, ओला-सुका दुष्काळ, तीव्र उष्णतेचा उन्हाळा, प्रचंड थंडीचा हिवाळा, नापिकी अशा साऱ्या घटना वारंवार घडून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. इ.स. २०५० मध्ये जगभर अतिवृष्टीचा अहवाल पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. लोकसंख्या वाढत आहे, शहरे वाढत आहेत मात्र जंगल नष्ट होत आहेत, झाडे तोडली जात आहेत या सर्व घटनांचा परिणाम पर्यावरणावर होत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एक किलो सिमेंट तयार करतांना तसेच एक किलो कोळसा विजेसाठी वापरताना त्यातून एक किलो कार्बनडॉय ऑक्साईड हवेत पसरला जातो. सिमेंटच्या रस्त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. याला आपणच जबाबदार आहोत.

- Advertisement -

प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय

प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड दत्तक घेऊन ते जगवले पाहिजे. हिरवा निसर्ग जिवंत ठेवायचा असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन ती झाडे जास्तीत जास्त कशी जगतील याचे नियोजन केले पाहिजे. पर्यावरण विभागाने घेतलेल्या निर्णयाबद्दल कदम म्हणाले, नगरपरिषद आणि महानगरपालिकांनी २५ टक्के निधी सांडपाणी पुर्नप्रक्रियेवर खर्च करण्यासाठी बंधन घातलेले आहे. मीठी नदीचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून त्या परिसरात जवळपास दोन लाख झाडे लावणार आहोत. काही दिवसात मीठी नदी पर्यटन स्थळ बनेल. प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशातील बरीच राज्ये महाराष्ट्राचा प्लास्टिक बंदीचा पॅटर्न राबविण्यासाठी पुढे आलेली आहेत. राज्यातील २५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या ५०० कंपन्या बंद केल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देण्यासाठी लवकरच ३५ लाख कापडी पिशव्या बाजारात येणार आहेत. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला ५ कोटी रुपये देणार आहोत. महाराष्ट्रातील पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी पर्यावरण विभाग कटिबद्ध असून देशातील सर्व राज्यांना महाराष्ट्राचा आदर्श घ्यावा लागेल, असे काम करणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

राज्यातील १७ शहरात हवेचे प्रदूषण

पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने निसर्ग चक्र बदलून गेले आहे. राज्यातील १७ शहरात हवेतील प्रदूषण वाढलेले आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून २७ शहरात हवा गुणवत्ता तपासणी यंत्रे बसविली आहेत. नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नदी संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. घरे बांधतांना रेनवॉटर हार्वेस्ट सिस्टिम करणे तसेच औद्योगिक परिसरात रासायनिक पाणी पुर्नर्प्रक्रिया शुद्धीकरण केंद्र स्थापन करणे बंधनकारक केले आहे.  – अनिल डिग्गीकर, प्रधान सचिव

- Advertisement -

वाचा – रामदास कदम हे उध्दव ठाकरेंचं पाळलेलं कुत्रं – नितेश राणे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -