घरमहाराष्ट्रमहात्मा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न; राज्याची शिफारस

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न; राज्याची शिफारस

Subscribe

क्रांतीसूर्य जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न मिळावे यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती आज ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात दिली. ओबीसी समाजाच्या अधिकार आणि हक्कासाठी हे सरकार कटिबद्ध असून इतर मागण्यांसाठी माझा दिल्लीत पाठपुरावा सुरु असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाअधिवेशनात दिले. वरळी येथे आज ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. बबनराव तायवाडे, शबीर अन्सारी हे महाअधिवेशनाचे मुख्य निमंत्रक होते.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या ओबीसींसाठी घोषणा

  • ओबीसी महामंडळाला ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.
  • ओबीसी समाजाचा बॅकलॉग हे सरकार भरून काढणार.
  • ओबीसी समाज विकासापासून वंचित आहे. या समाजाचा विकास होणार नाही, तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही.
  • राज्यात ओबीसी मंत्रालय सुरु केले. यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला.
  • ७० वर्षाच्या संघर्ष नंतर ओबीसी समाजाला घटनात्मक अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
  • ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार.

 

फुलेंना भारतरत्न मिळण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याचवर्षी लोकसभेत ही मागणी केली होती. “फुले दांम्पत्याने देशाच्या सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल”, असे मत सुळे यांनी व्यक्त केले होते. फुलेंना भारतरत्न जाहीर व्हावा यासाठी आपण सर्व पक्षभेद विसरुन एकत्र येण्याची गरज असल्याची भावना सुळे यांनी व्यक्त केली होती.

- Advertisement -

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न जाहिर करावा अशी मागणी संसदेत केली. नियम 377…

Posted by Supriya Sule on Monday, March 5, 2018

घोषणांचा कधीतरी आढावा घ्या – अशोक चव्हाण

वरळी येथे होत असलेल्या ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली. “ज्या घोषणा तुम्हा करता त्याची अंमलबजावणी आपण करतो की नाही याचा वर्षातून एकदा आढावा तरी घ्या”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी आज ज्या घोषणा केल्या त्या पुढच्या अधिवेशनापर्यंत पुर्ण होत आहेत की नाही ते पाहा, असे आवाहन चव्हाण यांनी महाअधिवेशनाच्या आयोजकांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -