घरमहाराष्ट्रसध्या हिंदुत्वाचा भेसूर चेहरा दिसतोय - उद्धव ठाकरे

सध्या हिंदुत्वाचा भेसूर चेहरा दिसतोय – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील बीकेसीच्या जाहीर सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल करत हिंदुत्वाच्या मुद्यावरून सध्या हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा दिसतोय असे सांगत भाजपला खडे बोल सुनावले. तसेच यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही जबरदस्त टोला लगावला.आता एक मुन्नाभाई केमिकल लोचा झाल्याने हिंदुत्वाची शाल घेऊन फिरतोय. स्वत:ला बाळासाहेब समजतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. तसेच तुम्ही बाबरी मशिदीवर चढला असता, तर तुमच्या वजनानेच बाबरी कोसळली असती, अशा शब्दांत ठाकरे यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.

हिंदुत्वावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमचे विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. हिंदुहृदयसम्राटांनी विचार दिला, तुम्ही विखार पसरवत आहात. भाजपचे लोक मनोरुग्ण आहेत. गेल्या वेळेस त्यांनी भगव्या टोप्या घातल्या. विचारले की का घातली, तर म्हणे हिंदुत्व ना. अरे हिंदुत्व टोपीत नसते, डोक्यात असते, मेंदूत असते. आमचे हिंदुत्व खरे की खोटे हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व हे काय धोतर आहे का? कधी नेसले कधी सोडले? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का? काँग्रेसबरोबर गेलो तरी हातातील भगवा गेला नाही. आमचे हिंदुत्व तकलादू नाही, हे विधानसभेतही मी सांगितले. सत्ता आली नाही तरी फरक पडत नाही, पण हिंदुत्व नाही सुटणार. काँग्रेससोबत गेलो तर उघड गेलो. तुमच्यासारखा पहाटे शपथविधी केला नाही. हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा आता आम्ही पाहत आहोत. खोटे बोलणे हे त्यांच्या हिंदुत्वात बसते, आमच्या नाही. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींचा का, असा सवालही ठाकरे यांनी केला

- Advertisement -

भाषणाच्या सुरुवातीलाच ठाकरे यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. आमचे हिंदुत्व घंटाधारी नाही तर गदाधारी आहे, असे मी मागे म्हटले होते. त्यावर काही दिवसांपूवी फडणवीस यांनी शिवसेनेचे हिंदुत्व हे गधाधारी असल्याचे म्हटले. आमचे तुमच्यासोबत जुने फोटो बघून तुमचा तसा गैरसमज होत असेल, मात्र आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गध्याला सोडून दिले आहे. शेवटी गाढव ते गाढवच. गाढवाने आम्हाला लाथ मारण्याआधी आम्हीच त्यांना लाथ मारली, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली.

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एका शिवसैनिकाने मला विचारले लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? त्यामध्ये संजय दत्तला गांधीजी दिसतात. तशीच एक केस आपल्याकडे आहे. ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. कधी मराठी तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. हा मुन्नाभाई भले तरी करीत होता. हा कुठला मुन्नाभाई. ही केमिकल लोच्याची केस आहे. अनेक मुन्नाभाई फिरत आहेत, फिरू द्या.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एका शिवसैनिकाने मला विचारले लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? त्यामध्ये संजय दत्तला गांधीजी दिसतात. तशीच एक केस आपल्याकडे आहे. ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. कधी मराठी तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. हा मुन्नाभाई भले तरी करीत होता. हा कुठला मुन्नाभाई. ही केमिकल लोच्याची केस आहे. अनेक मुन्नाभाई फिरत आहेत, फिरू द्या.

भाजपच्या १ मेच्या सभेत ते म्हणाले की, आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. जे पोटात तेच ओठांवर आले. तुमच्या सात पिढ्या आल्या तरी जमणार नाही. हौतात्म्य पत्करून मुंबई मिळवली आहे. देशातली पहिली बुलेट ट्रेन आपण मागितली नाही. हा मुंबई तोडण्याचा डाव आहे. संघाला दोन-चार वर्षांत १०० वर्षे होतील. मग स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ होता. ठाकरे कुटुंब या लढ्यात होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने सर्वांना एकवटले, मात्र जागा वाटपावरून यातून सर्वप्रथम जनसंघ बाहेर पडला. तेव्हापासून यांचा मुंबईचा लचका तोडण्याचा हेतू आहे. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला, तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी उद्धव यांनी दिला.

सरकारी कार्यालयात घुसून राहुल भट्टला गोळ्या घातल्या. आता तिथे हनुमान चालीसा म्हणायची का? आता काश्मिरी पंडितांसोबत जे सुरू आहे, ते काश्मीर फाईल्सचे पुढचे पान आहे काय, असा सवाल उद्धव यांनी केला.

संभाजीनगरमध्ये ओवेसी औरंगजेबाच्या थडग्यावर गेला. कुणाच्या हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात कबरीवर वाहण्यासाठी फुले द्यायची ही यांची ए, बी, सी टीम. त्यांच्यावर कारवाई होईल. मग आम्ही टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. राहुल भट्टला, पंडितांना सुरक्षा नाही, पण टीनपाट लोकांना वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा देत आहात. गळक्या टीनपाटांचा तुम्हाला काय उपयोग आहे. अशा पद्धतीचा कारभार सुरू आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -