घरताज्या घडामोडीGudi Padwa 2022 : सर्वांच्या एकजुटीमुळे निर्बंधातून मुक्त होऊ शकलो, मुख्यमंत्र्यांनी दिल्या...

Gudi Padwa 2022 : सर्वांच्या एकजुटीमुळे निर्बंधातून मुक्त होऊ शकलो, मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा

Subscribe

मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, ‘आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवूया. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकद, हिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

- Advertisement -

कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रवासियांना, जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी बांधवांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे.

- Advertisement -

कोरोनाचे संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छता, सुरक्षिततेची सवय वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया… निरोगी, बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया असे आवाहनही शुभेच्छा संदेशात केले आहे.


हेही वाचा : Water Supply : कुर्ल्यातील काही भागात ५ एप्रिलला कमी दाबाने पाणीपुरवठा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -