घरताज्या घडामोडीप्रकल्प कुठलाही असो, पाहुणा मात्र मुंबईचाच : मुख्यमंत्री

प्रकल्प कुठलाही असो, पाहुणा मात्र मुंबईचाच : मुख्यमंत्री

Subscribe

महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कार्यक्रमात पालकमंत्री छगन भुजबळांना मुख्यमंत्र्यांचा टोला

प्रकल्प कुठलाही असू द्या, मात्र उद््घाटनाला पाहुणा मुंबईचाच लागतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला. तत्पूर्वी, बोलताना पालकमंत्री भुजबळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून पुण्यातील प्रकल्प दुसरीकडे नेणे सद्यस्थितीत अवघडच असते, अशी कोपरखळी मारली होती. त्या वाक्याचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मिश्किल स्वरुपात उत्तर दिले.

नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीत उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आदींसह अकादमीचे अधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात नाशिकमधील काम उत्तम होते. मी सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच मास्क काढलाय. सर्व नियमांचे पालन केले आहे. तुम्हीही काळजी घ्या. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे कार्य हे नेहमीच उत्कृष्ट राहिलेले आहे. गुन्ह्यांचे स्वरुप आणि प्रकार बदलत असल्याने आता त्यानुसार पोलिसांनाही बदलावे लागेल. निदान पोलिसांना तरी यावेसे वाटेल, अशा स्वरुपाच्या पोलीस स्टेशन्सच्या निर्मितीची गरज आहे, असे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. पोलीस अकादमीसाठी आवश्यक सुविधांसाठी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्दही त्यांनी दिला.

- Advertisement -

११५ वर्षांपूर्वी पुण्याहून नाशिकमध्ये आणली गेली अकादमी

पोलीस अकादमी ११५ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी जॅक्सन यांनी पुण्याहून नाशिकमध्ये आणली होती. मात्र, आजकाल पुण्याहून इतर कुठेही एखादा प्रकल्प नेणे हे अवघड असल्याचे सांगत पालकमंत्री छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून टोला लगावला. याच वाक्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी पाहुणे नाशिकचे लागत असल्याचा टोला लगावला.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -