घरमहाराष्ट्रसीएमओ महाराष्ट्र फेसबुक पेजवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

सीएमओ महाराष्ट्र फेसबुक पेजवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

Subscribe

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकवर सीएमओ (Chief Minister Office) महाराष्ट्र नावाचे अकाऊंट उघडण्यात आले होते. आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ही दोन अकाऊंट उघडण्यात आली होती. पृथ्वीराज चव्हाण जाऊन जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा या अकाऊंटवर फडणवीस यांचा फोटो ठेवण्यात आला होता. तो आजतागायत कायम आहे. यापैकी ट्विटरवरील अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो काढून मंत्रालयाचा फोटो ठेवला आहे. मात्र फेसबुकवर अजूनही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहेत.

cmo fb
सीएमओ महाराष्ट्र फेसबुक पेज

देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवत असत. मुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेला प्रत्येक निर्णय असो, पत्रकार परिषदा आणि जाहीर कार्यक्रमाचे लाईव्ह ब्रॉडकास्ट करणे असो, या प्रत्येक गोष्टीसाठी फडणवीस यांची सोशल मीडिया टीम तत्पर असायची. तसेच मुख्यमंत्र्यांचे कार्यालय देखील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यक्रम, निर्णयांचे अपडेट्स ट्विटर आणि फेसबुकवर टाकत असत.

- Advertisement -
cmo twitter
मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल

मात्र देवेंद्र फडणवीस पायउतार झाल्यानंतर कदाचित ही कामे मागे पडलेली दिसतात. ट्विटरवरून जरी फडणवीस यांचा फोटो काढून टाकण्यात आला असला तरी फेसबुकवर अजून बदल झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी दि. २८ नोव्हेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर रात्रीच पहिली कॅबिनेट घेऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आज (२० नोव्हेंबर) मंत्रालयात सर्व सचिवांची बैठक घेऊन मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहार संघात पत्रकार परिषद घेतली. मात्र याचे कोणतेही अपडेट अजून फेसबुकवरून देण्यात आलेले नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -