घरमहाराष्ट्रपुण्यात नायजेरियन व्यवसायिकाकडून ९० लाखाचे कोकेन जप्त

पुण्यात नायजेरियन व्यवसायिकाकडून ९० लाखाचे कोकेन जप्त

Subscribe

उच्चभ्रू वस्तीत व्हायची कोकेन विक्री

पुणे शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना कोकेन जप्त केले आहे. पुण्यातील उंड्री परिसरातून तब्बल ९० लाखांचे कोकेन जप्त करीत एका नायजेरीन व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. पुणे शहरात एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले होते, या पथकाने सापळा रचून उंड्री परिसरातून आरोपीच्या घरावर छापा मारून या छाप्यात घराची झडती घेतली.

यावेळी तिथे ७३३ किलो ग्रॅम कोकेन ज्याची किंमत ८७ लाख ९६ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय ३ लाख ६८ हजार ७० रुपये रोख रक्कम, १००० रुपयांच्या प्लॅस्टिक पिशव्या, ९० हजार रुपये किंमतीची तीन घड्याळे व २४ हजार किंमतीचे पाच मोबाईल सेट जप्त करण्यात आले असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

- Advertisement -

अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव शोलाडॉये सॅम्युअल जॉय असून त्याचे वय ४४ वर्ष आहे. हा इसम उंड्री परिसरात कोकेन विकत असून कप्स्टोन सोसायटी या उच्चभ्रू परिसरात तो भाड्याने फ्लॅट घेऊन राहत आहे, अशी माहिती मिळाली.

तसेच या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपी जॉय याच्याकडून ८८ लाखाचे कोकेन जप्त केले. आरोपी जॉय हा भारतात फेब्रुवारी महिन्यात बिझनेस व्हिसा घेऊन आला होता. यावेळी त्याने कपड्यांचा व्यवसाय करणार असल्याचे त्याने व्हिजा मिळवताना सांगितले होते, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -