घरमहाराष्ट्रकोरोनाच्या काळातही उध्दव ठाकरेंना शुभेच्छा देणारे फलक वांद्र्यात झळकले

कोरोनाच्या काळातही उध्दव ठाकरेंना शुभेच्छा देणारे फलक वांद्र्यात झळकले

Subscribe

मुंबईत, वांद्र्यात कोरोनाचा कहर, आणि नगरसेवक शुभेच्छात व्यस्त

शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल वांद्र्यांत शुभेच्छांचे फलक लावले गेले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदा परब यांनी हे शुभेच्छांचे फलक लावले आहेत. एका बाजुला मुंबईतील जनता कोरोनामुळे भीतीच्या छायेखालील घरात बसून दिवस ढकलत आहेत. तसेच मुंबईसह या एच-पूर्व विभागात कोरोनाचा कहर असताना शिवसेनेचे नगरसेवक हे पक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात मुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा अपयशी ठरत असताना शिवसेनेची मंडळी शुभेच्छा देण्यात धन्यता मानत असल्याने मनसेने तीव्र आक्षेप घेतला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल वांद्रे कलानगरसह इतर भागांमध्ये सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी होर्डींग लावले आहे. मात्र, या होर्डींगवर मनसेचे अखिल चित्रे यांनी आक्षेप घेत लॉकडाऊनच्या काळात होर्डींगबाजी करायला नियमावलीत परवानगी आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. सदा परब प्रतिनिधीत्व करीत असलेल्या एच-पूर्व भागात कोरोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव आहे. परंतु या भागातील जनतेच्या त्रासाकडे परब यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप चित्रे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपच्या आंदोलनावर अजित दादा, बाळासाहेब थोरात संतापले


मुंबई महाराष्ट्र कोरोना संकटात असताना मातोश्री बाहेर शिवसेनेची बॅनरबाज सुरु आहे. शिवसेनेचे नगरसेवक अशाप्रकारे कशी बॅनरबाजी करू शकतात सवाल करत चित्रे यांनी सुधार समिती अध्यक्ष कोरोनाच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष न देता ते बॅनरबाजीमध्ये व्यस्त असल्याचे दिसतात, असेही म्हटले आहे. त्यामुळे कोरेानाचे गांभिर्य या नगरसेवकाला नाही,असेही ते म्हणाले.

- Advertisement -

लॉकडाऊन मध्ये बॅनरची दुकाने उघडी केली आहेत का असा सवाल करत त्यांनी जाहिरातबाजी करण्याची ही वेळ नाही तर जनतेला होणाऱ्या त्रासातून मुक्त करा, असा सल्लाही दिला आहे. रुग्णालयात कोविड काळात रोजच्या रोज होणारी नागरीकांची गैरसोय थांबवण्यासाठी उपाययोजना व आवश्यक सुधारणा करा, जाहिरात राजकारण इत्यादींवर वेळ वाया घालवू नका असाही उपरोधिक टोला त्यांनी मारला..

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -