घर देश-विदेश शरद पोंक्षेंनी राहुल गांधीवर केलेल्या टीकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

शरद पोंक्षेंनी राहुल गांधीवर केलेल्या टीकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : राहुल गांधी काही ओरिजनल गांधी नसून खान आहे, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस राहुल गांधीवर केली आहे. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी शरद पोंक्षेंवर ट्विट करत निशाणा साधला आहे. “शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच. पण माणूस म्हणून ही नीच आहे”, अशी प्रतिक्रिया ट्वीट करत दिली आहे.

- Advertisement -

शरद पोंक्षेंनी राहुल गांधीवर केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले, “हा विकृत पोंक्षे अजुन काय बोलू शकतो. नथुरामची अवलाद…” स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात तिरंगा रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याखान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शरद पोंक्षे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

- Advertisement -

हेही वाचा – “राहुल गांधी ओरिजनल गांधी नसून खान”, शरद पोंक्षेंची टीका

शरद पोंक्षे नेमके काय म्हणाले

यावेळी शरद पोंक्षे म्हणाले, “तू गांधी नाही अन् सावकर देखील नाही. हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहेत. महात्मा गांधींचे वंशजही नाहीत. गांधींच्या आडनावांचा फायदा यांनी घेतला. मुळचे हे फिरोज खान हाच यांचा इतिहास आहे. या मुर्खांना त्यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही. मग सावरकरांचा इतिहास कसा माहिती असणार?, असा सवाल करत त्यांनी टीका केली. हे व्याख्यानाचे आयोजन मालेगावातील सटाणा नाका येथील श्रीलक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा प्रयोग

शरद पोंक्षे यांचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगले गाजले आहे. पण या नाटकाला मोठा विरोध देखील झाले आहेत. या नाटकाचे पुन्हा प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे. या संदर्भातील शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पुन्हा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगमंचावर घेऊन येण्याची घोषणा केली आहे.

- Advertisment -