घरमहाराष्ट्रBJP : 'घर चलो अभियाना'मार्फत भाजपचा 3 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

BJP : ‘घर चलो अभियाना’मार्फत भाजपचा 3 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

Subscribe

भाजपकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पक्ष 'घर चलो अभियान' राबविणार आहे. याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण त्याआधीच आता राजकीय पक्षांकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी केली जात आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पक्ष ‘घर चलो अभियान’ राबविणार आहे. याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळाला वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे याच निमित्ताने त्यांनी पत्रकार परिषद घेत घर चलो अभियानाबाबतची माहिती दिली आहे. (BJP’s attempt to reach 3 crore people through ‘Ghar Chalo Abhiyan’)

हेही वाचा – ‘ईडी’ची कामगिरी, 6 वर्षांत केली 1 लाख 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त

- Advertisement -

यावेळी ‘घर चलो अभियाना’बाबत सांगताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखपर बावनकुळे म्हणाले की, आज जी आमची नवीन कार्यकारणी झाली, नवे जिल्हाध्यक्ष झाले यांच्या समवेत मी महाराष्ट्राच्या 28 लोकसभांमध्ये घर चलो अभियान राबविणार आहे. यामध्ये 20 तारखेपासून चंद्रपूर लोकसभेपासून या अभियानाला सुरुवात करणार आहे. तर उत्तर मुंबईच्या लोकसभेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 28 लोकसभा अठ्ठावीस लोकसभेचा प्रवास सुरू करणार आहोत. या अठ्ठावीस लोकसभामध्ये एकही घर असे शिल्लक राहणार नाही ज्या घरापर्यंत आम्ही या अभियानाच्या मार्फत पोहोचणार नाही. सर्व स्तरापर्यंत, सर्व पक्षातील लोकांच्या घरी, सर्व समाजाच्या शेवटच्या घरापर्यंत आम्ही जाणार आहोत. प्रत्येक विधानसभेमध्ये 100 कार्यकर्ते या अभियानामध्ये प्रवास करणार आहेत.

त्याचप्रमाणे एका लोकसभेमध्ये 600 कार्यकर्ते माझ्यासोबत प्रवास करतील. तसेच एका महिन्यामध्ये 3 कोटी जनतेपर्यंत भारतीय जनता पक्ष आपला प्रवास पूर्ण करतील. पक्षाचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, आजी-माजी नेते या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहिती बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय या अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकारने त्या-त्या लोकसभेमध्ये नेमकी कोणती कामे केली आहेत, याबाबतचे पुस्तक नागरिकांना देण्यात येईल. केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षांत केलेल्या कामाची माहिती देखील लोकांना पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे बावनकुळेंनी सांगितले. तर, एका विधानसभेमध्ये 30 ते 50 हजार नागरिकांना सरळ ऍपवर आणणे आणि केंद्र आणि राज्याशी सरळ जोडण्याचे काम देखील या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -