घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत बिघाडी? 2024 साठी आमचा प्लॅन तयार; कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

महाविकास आघाडीत बिघाडी? 2024 साठी आमचा प्लॅन तयार; कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

Subscribe

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 2024 ला महाविकास आघाडी एकत्र लढली नाही तर आमचा प्लॅन बी तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी कोसळणार की राहणार यावर साशंकता व्यक्त केली जात आहे.

2024 ला मविआ एकत्र लढेल की नाही हे आताच कसं सांगणार, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याने असचं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 2024 ला मविआ एकत्र लढणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 2024 ला महाविकास आघाडी एकत्र लढली नाही तर आमचा प्लॅन बी तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी कोसळणार की राहणार यावर साशंकता व्यक्त केली जात आहे.  ( Congress leader Nana Patole commented on MVA 2024 Loksabha Election  )

- Advertisement -

काय म्हणाले नाना पटोले?

आज निवडणूक होत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? त्याबाबत चर्चा आत्ता करत नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होईल. आमचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढायची आहे. मात्र, जर 2024 ला महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लान तयार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात चुकून लोकांनी भाजपला 105 आमदार दिले. महाराष्ट्रात कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली. भाजपचे आमदार निवडून देणं जनतेची चूक होती. संख्या बळाच्या आधारावर प्यादे चालवण्याचं काम भाजप करत आहे. मात्रे हे अधिक काळ चालणार नाही, असं पटोले यांनी सांगितलं.

- Advertisement -

( हेही वाचा: मुख्यमंत्री शिंदेचे Work From Home, सातारा येथून केला मंत्रालयातील ६५ फाईल्सचा निपटारा )

राज्यातील सरकार असंवैधानिक

राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. मागच्या वर्षभरात राज्यात गंमतजंमत सुरु आहे. हे सगळं राज्याला लाजवणारं आहे. सिरियस सरकार नाही. जनेतची तिजोरी लुटणारं सरकार आहे. खारघरचं प्रकरण भयानक होतं. उन्हात तळफडत लोकांना मारलं. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळीमा फासणारी घटना आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी खारघर प्रकरणावर दिली.

कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात राहुल गांधी यांच्या सात सभा होणार आहेत. मुंबईत राहुल गांधी यांची सभा होणार आहे. प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा होतील, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -