घरमहाराष्ट्रउत्सवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश केंद्राने दिले, मोदींविरोधात भाजप आंदोलन करणार का? -...

उत्सवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश केंद्राने दिले, मोदींविरोधात भाजप आंदोलन करणार का? – सचिन सावंत

Subscribe

दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप राज्यभरात शंखानाद आंदोलन करत आहे. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने उत्सवांवर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजप नेते आंदोलन करणार का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला. (Agitation To Reopen Temples)

सचिन सावंत यांनी भाजपच्या शंखानाद आंदोलनावर घणाघआती टीका केली आहे. शंखानाद आंदोलन करणाऱअया भाजपला शंखासुराची उपमा देत आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत असल्याची टीका सावंत यांनी केली. भाजप शासित राज्यातील सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? असा सवाल देखील सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

“शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वत: मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही. भाजपा सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का? दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे. रुग्ण वाढले तर मोदी टिका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. पोलीसांनी कठोर कारवाई करावी बघ्याची भूमिका घेऊ नये,” असं आवाहन सचिन सावंत यांनी केलं.

- Advertisement -


हेही वाचा – तिसऱ्या लाटेचा धोका आहे तर दारुविक्रीला मुभा का?, चंद्रकांत पाटलांचा सवाल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -